1 जून म्हणल कि सगळ्यांच्या स्टोरीज वर दिसतात ते अनेकांचे वाढदिवस साजरे केले जातात. अभिनेता प्रसाद खांडेकरच्या आईचा सुद्दा काळ वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त प्रसादने आईला खास गिफ्ट देत तिच्यासाठी काही सुंदर ओळी लिहिल्या आहेत. आई सोबतच फोटो पोस्ट करत प्रसादने लिहिलंय “(Prasad Khandekar Mother)
“Happy wala birthday आई
वाढदिवसाची नक्की डेट माहीत नसणाऱ्या करोडो लोकांचा घोषित वाढदिवस 1 जून ला साजरा होतो तसाच तुझा ही साजरा होतोय आई ….नक्की वय तुला ही सांगता येणार नाही ….आणि नकोच मोजूस …कारण मला अजून ही तू तशीच तरुण वाटतेस ….जशी मला माझ्या लहानपणी वाटायचीस …
अजून ही रात्री शूट वरून प्रयोगावरून किती ही लेट होउदे …वाट बघत जागीच असतेस …..कधी कधी वैतागतो मी की का एवढ्या रात्री लेट पर्यंत वाट बघत जागी राहतेस …पण कधी चुकून तुझा फोन नाही आला तर मलाच चुकल्यासारख वाटत …आणि मग मीच फोन करून विचारतो फोन का नाही केलास आई ……
बाबू जरा वजन कमी कर म्हणत दोन पोळ्या जास्तीच्या तूच वाढतेस ….भाताने शुगर वाढते बोलतेस पण मला आवडतो म्हणून थोडा तरी डाळभात बळेच खाऊ घालतेस .. सगळ्यांनाच आईचे कष्ट माहीत असतात तसे मला ही माहीत आहेत पण श्लोक ज्या वेळी अल्पा च्या पोटात होता त्यावेळी तू माझ्यासाठी सोसलेल्या कष्टाची पुन्हा नव्याने जाणीव झाली
आई happy wala birthday तुला खुप खुप खुप शुभेच्छा
प्रसादच्या या पोस्ट वर अनेक कलाकारांनी आणि प्रेक्षकांनी कमेंट्स केल्या आहेत. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून प्रेक्षकांना हसवण्याचं काम अभिनेता प्रसाद खांडेकर अगदी चोखपणे करताना दिसतोय.(Prasad Khandekar Mother)