भाग्य दिले तू मला मालिका ही टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या पाच मध्ये आहे. या मालिकेचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे. या मालिकेत आलेल्या एकामागोमाग एक रंजक वळणांमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतेय. अशातच या मालिकेच्या नव्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. मालिकेत वैदेहीवरील हल्ल्यामुळे सगळ्यांचीच काळजी वाढलेली पाहायला मिळाली.(Bhagya Dile Tu Mala Update)
त्यानंतर आता आलेल्या प्रोमोमध्ये असे पाहायला मिळणार आहे की, वैदेही ही बरी होऊन घरी येते, तेव्हा सगळेजण विचारतात की तुझ्यावर कोणी हल्ला केला, तेव्हा वैदेही सांगते की, सुरुवातीला माझ्यात आणि राजमध्ये बाचाबाची झाली तेव्हा त्याने मला ढकललं, मी खाली कोसळले आणि माझ्या डोक्याला मार लागला, त्यानंतर मी राजला आवाज देत होते मात्र राजने काही माझ्याकडे वळून पाहिलं नाही आणि तो तसाच घराबाहेर निघून गेला. त्यांनतर मी स्वतःला सावरत उठण्याचा प्रयत्न करत होते, तेवढ्यात मागून माझ्या डोक्यावर हल्ला करण्यात आला.
पहा सानियाला कोण विचारणार आहे जाब (Bhagya Dile Tu Mala Update)
मी बेशुद्ध होऊन खाली पडणार इतक्यात..’ असं म्हणत वैदेही थांबते. त्यानंतर वैदेहीवर कोणी हल्ला केला हे कळल्यावर सगळयांना धक्का बसतो. त्यानंतर निवेदिता या सानियाजवळ जातात, आणि तिचा चांगलाच पाणउतारा करताना दिसत आहेत. त्या सानियाला सांगतात की, मी तुला म्हटलं होत जे माझं आहे ते मी मिळवूनच राहणार. त्यांनतर सानिया सांगते कि आजपासून मी इथे राहणार नाही, मला या घरात राहायचं नाही, त्यावर राज सानियाजवळ येतो आणि तिला म्हणतो की, तुला इथे राहण्याशिवाय पर्याय नाही. आता तुझ्या म्हणण्या प्रमाणे नाही तर तुला आमचं ऐकावं लागणार. (Bhagya Dile Tu Mala Update)
हे देखील वाचा – स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरी होणार वटपौर्णिमा
तुझ्यासाठी माझ्याजवळ प्रपोजल आहे, यावर सानिया म्हणते तुला असं वाटतंय का मी तुझं प्रपोजल एक्सेप्ट करेन. यावर राज म्हणतो, तुला माझं प्रपोजल स्वीकारावच लागेल, नाहीतर मी पोलिसात जाऊन सांगेन की, वैदेहीवरील हल्ल्याचा खरा आरोपी कोण आहे. सानियाच पितळ आता सगळ्यांसमोर उघड झालेलं आहे. आता याचा फायदा करून सानियाकडून मोहिते कुटुंब त्यांची संपत्ती परत मिळणार का हे पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.
