‘मन उडू उडू झालं’ फेम अभिनेता अजिंक्य राऊत चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. याआधी त्याने ‘विठू माउली’ मालिकेत साकारलेली विठु माऊलीची भूमिकाही प्रचंड गाजली होती. तसेच त्याने ‘अजब प्रीतीची गजब कहाणी’ मलिकेतही काम केले आहे. मात्र त्याची ‘मन उडू उडू झालं’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेमुळे अजिंक्य घराघरांत पोहोचला. अभिनेता सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. मालिकांसह चित्रपटातही काम करत त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
सोहळा मीडियावर तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामाबद्दलची माहिती शेअर करत असतो. अशातच अभिनेत्याने त्याच्या आयुष्यात आलेला एक नवीन आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. अजिंक्यने नुकतीच एक नवी कोरी आलिशान कार खरेदी केली आहे आणि सोशल मीडियाद्वारे त्याने त्याचा नवीन कार खरेदी केल्याचा आनंद चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
अजिंक्यने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अजिंक्यने त्याच्या नवीन कारची झलक दाखवली आहे. या व्हिडीओसह त्याने असं म्हटलं आहे की, “आनंदी, सोपे आणि समाधानी जीवन. तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात खरी होवोत आणि ही स्वप्ने पूर्ण होण्याचा आनंद त्याच्या डोळ्यात दिसूदेत, ज्यांनी तुमची प्रगती होत असताना तुम्हाला पाहिले आहे.”
यापुढे अजिंक्यने “यासाठी मी कृतज्ञ व धन्य असून मला याक्षणी माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे. पण मला माहित आहे की ते तिथे खूप आनंदी आहेत आणि त्यांना माझा अभिमानदेखील आहे. तसेच या क्षणासाथी मला माझे गुरू सद्गुरु वेणा भारती महाराज यांचे आशीर्वाद मिळू शकले याचाही मला आनंद आहे.”
आणखी वाचा – साखरपुड्यानंतर पूजा सावंतची होणाऱ्या नवऱ्याबरोबरची पहिली पोस्ट, मराठमोळ्या लूकने वेधलं लक्ष
दरम्यान, अजिंक्यने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली हृता दुर्गुळे, अभिषेक राहाळकर, विवेक सांगळे, प्राजक्ता परब, शिवानी बावकर यांसह अनेक कलाकार मंडळींनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अजिंक्यची अनेक चाहत्यांनीही त्याला या नवीन कारसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच लवकरच त्याचा ‘कन्नी’ या चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.