अभिनेत्रीचं फोटोशूट म्हटलं की सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. सोशल मीडियावरील कलाकारांच्या फोटोशूटची झलक पाहणं चाहत्यांच्या विशेष पसंतीस पडत. अशातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने केलेल्या फोटोशूटने सोशल मीडियावर चांगलीच हवा केली आहे. मराठमोळ्या अंदाजात केलेलं हे फोटोशूट प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस पडलंय. (Prarthana Behere New Photoshoot)

खणाची साडी, केसात गजरा, कपाळावर चंद्रकोर आणि नववारी साडी नेसून गावाकडील मातीच्या घरात केलेलं हे प्राजक्ताचं फोटोशूटने आणि तिच्या देखण्या रूपाने साऱ्यांना भुरळ घालतंय.

प्रार्थना नेहमीच तिच्या फोटोशूटमुळे चेचेत असते, मात्र आता पोस्ट केलेल्या प्रार्थनाच्या या मराठमोळ्या लूकने साऱ्यांचीच बोलती बंद केली आहे. (Prarthana Behere New Photoshoot)
पाहा प्रार्थनाच्या मराठमोळ्या लूकवर श्रेयाची लक्षवेधी कमेंट (Prarthana Behere New Photoshoot)

नाजूक, सरल आणि मोहक असं हे प्रार्थनाच रूप साऱ्यांनाच मोहिनी घालतंय.

प्रार्थनेच्या या लूकवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील तिचा सहकलाकार आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे याने ही कमेंट केली आहे. प्रार्थनाच लुक पाहून श्रेयसलाही कमेंट करण्याचा मोह आवरला नाही आहे. (Prarthana Behere New Photoshoot)
हे देखील वाचा – भाग्य दिले तू मला मालिकेतील ‘हा’ कलाकार झळकणार अकुंश चौधरी सोबत

‘अय मॅडम मार ही डालोगे’ असं म्हणत त्याने प्रार्थनाच्या फोटोशूटच्या व्हिडिओवर कमेंट केली आहे. शिवाय प्रार्थनाच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनाही भरभरून कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे.

एका चाहतीने कमेंट करत लिहिलं आहे की, ‘मोगऱ्याच्या फुलांचा तो गजरा, तुझ्या सुंदरते समोर लाजलाच जणू’.(Prarthana Behere New Photoshoot)
प्रार्थनाने आजवर तिच्या अभिनयाने आणि फोटोशूटने चाहत्यांची मन जिंकली आहेत. शिवाय माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील तिच्या नेहा या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. या मालिकेत प्रार्थना श्रेयस तळपदे सोबत झळकली. त्यांच्या जोडीचंही सर्वत्र कौतुक होताना दिसलं. या फोटोशूटआधी प्रार्थनाच्या बोल्ड फोटोशूटची सर्वत्र चर्चा रंगली होती. मालिकेनंतर आता प्रार्थना एका चित्रपटातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लंडन येथे शूटिंग सुरु असल्याचे बरेच व्हिडीओ तिने तिच्या सोशल मीडियावरून पोस्ट देखील केले आहेत.
