शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

केक कापला, फुलांची उधळण केली अन्…; ‘बिग बॉस १९’ मधून घरी परतताच प्रणित मोरेचं कुटुंबियांकडून कौतुक, व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
डिसेंबर 9, 2025 | 12:53 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Pranit More Video

'बिग बॉस १९' मधून घरी परतल्यावर प्रणित मोरेचं जंगी स्वागत

Pranit More Video: ‘बिग बॉस’ १९ चा यंदाचं पर्व नुकतंच पार पडलं. हिंदी टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेता गौरव खन्ना यंदाच्या पर्वाचा विजेता ठरला. तर रनरअप फरहाना भट्ट होती आणि तिसऱ्या स्थानी महाराष्ट्राचा लाडका प्रणित मोरे होता. प्रणित मोरेला प्रेक्षकांचा दणदणीत पाठिंबा मिळाला. तो जिंकेल अशी सर्वांना आशा होती पण त्याला टॉप 3 मध्ये समाधान मानावे लागले. या निकालामुळे प्रणित व त्याचे चाहते निराश झाले. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जरी त्याने पटकावली नसली तरीही त्याने अनेकांची मनं जिकंली.

तर ‘बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर प्रणित ३ महिन्यांनी स्वतःच्या घरी गेला. यादरम्यान त्याच्या मुंबईच्या घरी त्याच जंगी स्वागत करण्यात आलं. या जंगी सेलिब्रेशनचा व्हिडीओ प्रणितच्या भावाने सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. यावेळी प्रणितच्या मित्रमंडळींनी आणि कुटुंबीयांनी त्याचं मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. स्वागतादरम्यान त्याच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला याचबरोबर त्याच्या स्वागतासाठी सुंदर सजावट ही करण्यात आली. तसेच प्रणितच्या आईने त्याचं मराठमोळ्या पद्धतीने औक्षण ही केलं. त्यानंतर प्रणितने त्याच्या लाडक्या भाच्याबरोबर केक कटिंग देखील केलं. यावेळी प्रणितचे मित्र-मैत्रिणी, नातेवाईक सगळेच या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होताना व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं.

आणखी वाचा: वडिलांच्या आठवणीत लेकाची वाईट अवस्था, धमेंद्र यांच्या वाढदिवसाला पोस्ट शेअर करत सनी देओल व्यक्त, म्हणाला, “माझ्या हृदयात…”

View this post on Instagram

A post shared by Prayag More (@prayagmore)

प्रणितचा भाऊ प्रयागनं त्याच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सद्वारे वर्षाव केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी कमेंट्सद्वारे ‘प्रणित ‘बिग बॉस १९’चा विजेता व्हायला पाहिजे होता, ‘प्रणितच खरा विजेता आहे’, ‘तू ट्रॉफी जिंकली नसलास तरी अनेकांची मनं जिंकली आहेस, अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ‘बिग बॉस १९ च्या घरातला प्रणितचा संपूर्ण प्रवास हा खूपच रंजक होता. मध्यंतरी तो या शोमधून प्रकृतीच्या कारणास्तव बाहेर गेला होता. मात्र बरा होऊन तो शोमध्ये पुन्हा आला. विजेतेपदाच्या ट्रॉफीवर प्रणितचा मित्र गौरव खन्नानं आपलं नाव कोरलं, पण गौरवच्या विजयाचाही प्रणितला तितकाच आनंद झाला. ग्रँड फिनालेनंतरच्या मुलाखतीमधून त्यान याबद्दलची प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

आणखी वाचा: “त्याला कोणीतरी जास्त देतं म्हणून…”, सूरज चव्हाणवर भडकला डीपी, म्हणाला, “त्याला तीन-चारवेळा कॉल केले पण…”

Tags: Bigg Boss 19entertainmentpranit more
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Paaru-Aditya Returns Kirloskar Mansion

अखेर पारू-आदित्यचं अहिल्यादेवींनी केलं स्वागत, किर्लोस्कर घरात एंट्री केली अन्…; प्रोमो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.