अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. तिने मालिका, चित्रपट, वेबसीरिज यात तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकल. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. प्राजक्ता सोशल मीडियावर ही बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिच्या सर्वच फोटोंना चाहत्यांची पसंती मिळते.(prajakta mali new photo)
आपल्या मनमोहक अदाकारीने प्राजक्ताने चाहत्यांच्या मनात घर केलेच आहे. नुकताच प्राजक्ताने एक साडीतील फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत चाहत्यांचा लाकसध वेधून घेतलं आहे. या साडीतील फोटोत प्राजक्ताचा लूक सुंदर दिसत असून तिच्या नजरेने साऱ्यांनाच वेड केलं आहे. या फोटोंनी तर चाहत्यांना भुरळ घातलीच आहे मात्र प्राजक्ताने फोटोला दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. ‘मौसम है आशिकाना ए दिल..कही से उनको ऐसे में ढुंढ लाना..|’ या कॅप्शन सोबत प्राजक्ताने तळ टीप दिलेल्या मौसम आशिकाना मनात आहेत, मुंबईत नाही या टिपने साऱ्यांचं लक्ष वेधलंय.
पहा प्राजक्ताने काय दिलंय फोटोला कॅप्शन – (prajakta mali new photo)

प्राजक्ताने पोस्ट केलेल्या या फोटो आणि कॅप्शनवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका युजरने इतकी निरागसता कशी ग तुझ्या चेहऱ्यात म्हणत प्राजक्ताच्या निरागसतेचं कौतुक केलंय. तर एका युजरने मजेशीर कमेंट करत म्हटलंय, कधी कधी वाटत मला, तुझी नागरिकता तपासावी, माझा संशय आहे तू स्वर्गातील अप्सरा आहेस, असे म्हणत तिची स्तुती केलीय. तर बऱ्याच चाहत्यांनी प्राजक्ताच्या या फोटोजना हार्ट ईमोजी शेअर करत पसंती दर्शिवलीय.(prajakta mali new photo)
====
हे देखील वाचा – ‘…मात्र त्यांनी मला नाकारले होते’, म्हणत पृथ्वीकने केला हास्यजत्रेबाबत खुलासा
====
प्राजक्ता माळी अभिनेत्री तर आहेच मात्र ती व्यावसायिक सुद्धा आहे. तिने पारंपारिक दागिन्याचा व्यवसाय सुरू केला असून प्राजक्ताराज असं तिच्या व्यवसायाचं नाव आहे. विशेष म्हणजे तिच्या या दगिनाच्या व्यवसायाला देखील चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. यासोबत प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसून येते.
