धकधकगर्ल माधुरी दीक्षित केवळ तिच्या अभिनयामुळेच नाही तर तिच्या सुंदरतेसाठीही नेहमीच चर्चेत असते. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तिने फॅन्सना वेड लावलं.अश्या नेहमी हसमुख असणाऱ्या अभिनेत्रीवर सध्या दुःखाचा डोंगर कोसळला आहे.माधुरी दीक्षितची आई स्नेहलता दीक्षित यांचं काल निधन झालं. त्या ९१ वर्षाच्या होत्या. रविवारी दुपारी वरळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माधुरीच्या दुःखात तिचे पती श्रीराम नेने देखील तिच्यासोबत होते.(Madhuri Dixit )
माधुरी ही अनेकदा सोशल मीडियावर आईसोबतचे फोटो शेअर करत त्याच्यासाठी पोस्ट लिहिताना दिसून आली. तिची आईच तिची खूप चांगली मैत्रीण आहे असं देखील तिने अनेकदा म्हटलं, पण आज अचानक आईच्या खोलीत कोणी दिसत नाही हे पाहून ती भावुक झाली, आणि तिने आईच्या आठवणीत पोस्ट केली. तिने आईसोबतचा एक फोटो शेअर करत म्हंटल आहे की, आज सकाळी उठले आणि आईची खोली रिकामी होती.त्याक्षणी फार विचित्र वाटलं.तिने आम्हाला नेहमी आयुष्य जगायला आणि आयुष्यात आनंदी राहायला शिकवलं.ती नेहमी इतरांसाठी जंगली, आईची आठवण आम्हाला नेहमी येत राहील.तिच्यात बुद्धी चातुर्य, सकारात्मकता,आणि विशेष म्हणजे एक आकर्षित शक्ती होती. तिच्या आठवणीत आता आम्ही आयुष्य जगणार आहोत ओम शांती असं म्हणत ती भावुक झाली. तर तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांसोबत कलाकारांनी देखील तिला कमेंटमार्फत धीर दिलाय.(Madhuri Dixit )
====
हे देखील वाचा – ‘…मात्र त्यांनी मला नाकारले होते’, म्हणत पृथ्वीकने केला हास्यजत्रेबाबत खुलासा
====
दरम्यान श्रीमान नेने यांचंदेखील माधुरीच्या आईसोबत खास नातं होतं . त्यांनी देखील आईच्या निधनांनंतर भावुक पोस्ट केली, त्यांनी देखील स्नेहलता यांच्यासोबतच एक फोटो शेअर केला.आमच्या आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या उपस्थतीमध्ये निधन झालं.मी भावनिक आणि शारीरिकदृष्ट्या खचलो , पण माझे कुटुंब,मित्र आणि तुमच्या प्रेमामुळे हे सगळं सहन करण्याची ताकद मला मिळाली. आम्ही त्यांना कधीच विसरु शकत नाही. कायम त्यांची आठवण येत राहील” असं म्हणत ते देखील भावुक झाले आहेत.