‘झी मराठी’वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून नाट्यमय वळणं येत आहेत. रुपालीला विरोचकाने नवी शक्ती दिल्यानंतर विरोचकाने त्या शक्तीचा वापर राजाध्यक्ष कुटुंबियांविरुद्ध करत असल्यामुळे त्रिनयना देवीच्या मुली आता हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. रुपालीने आपल्या नव्या शक्तीने केतकी काकू, फाल्गुनी, शेखर, तेजस, तन्मय यांना संमोहित केले असून आपल्या बाजूने वळवले आहे.
नुकत्याच झालेल्या भागात भागात रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने तन्मय, तेजस, केतकी काकू, फाल्गुनी, शेखर या सर्वांना वश करुन नाचायला सांगते आणि घरातील ही सगळी मंडळी ‘झिंगाट’ या गाण्यावर नाचतानाचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील नेत्रा, अद्वैत व इंद्राणी हे सोडून सर्वच जण रुपालीच्या संमोहित होण्याच्या शक्तीने तिच्या बाजूने वश झाले आहेत.
आणखी वाचा – ‘अक्षय्य तृतीया’ म्हणजे नेमकं काय?, ‘या’ दिवसाचं महत्त्व आहे खूपच खास, जाणून घ्या…
अशातच आता या मालिकेचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये रुपाली घरातील सर्व सदस्यांना एका खोलीमध्ये जमा करुन एक खेळ खेळत आहे. ज्यामध्ये ती सर्वांना वर्तुळाकार बसायला सांगून फरशीवर फाल्गुनीला चाकू फिरवायला सांगते. यामध्ये रुपाली सर्वांना उद्देशून असं म्हणते की, “म्हातारा, म्हातारी, ममताच्या शेजारी कुणाचा फोटो यायला हवा असं तुम्हाला वाटतं” आणि यापुढे ती फाल्गुनीला सूरी मध्ये ठेवून फिरवायला सांगते आणि म्हणते “बघू कुणाचा नंबर येतो?”. यानंतर तो चाकू शेखरच्या दिशेने थांबताना या प्रोमोमध्ये दिसत आहे.
आणखी वाचा – प्राजक्ता माळीचं निर्मितीक्षेत्रात पदार्पण, मराठीतील मोठ्या चित्रपटाची केली घोषणा, पोस्टर समोर
त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबियांपैकी कुणाचा बळी जाणार? कुणाचा जीव जाणार का? की आणखी काय होणार? त्याचबरोबर नेत्रा व इंद्राणी या देवीआईच्या लेकी राजाध्यक्ष कुटुंबियांना विरोचकाच्या तावडीतून कसं मुक्त करणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आगामी भागांसाठी प्रेक्षक चांगलेच आतुर आहेत.