२०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठान’ आणि ‘जवान’ चित्रपटाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर बॉलिवूड स्टार शाहरुख खान लवकरच दिग्दर्शक राजकुमार हिरानींच्या ‘डंकी’ चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटातील अवघ्या काही सीन्सचं शूटिंग बाकी आहे. येत्या ख्रिसमसला हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. अशातच साऊथचा सुपरस्टार प्रभासच्या बहुप्रतीक्षित ‘सालार’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. (Salaar movie Release Date)
२०१६ मध्ये आलेल्या ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली २’ चित्रपटाने प्रभासला मोठे यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर आलेले सर्व चित्रपट फ्लॉप ठरल्यानंतर अभिनेत्याला आता ‘सालार’कडून मोठी अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी याचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता याचा नवा पोस्टरसह चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली. येत्या २२ डिसेंबरला ‘सालार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रथमच प्रभासच्या ‘सालार’ची शाहरुखच्या ‘डंकी’शी टक्कर होणार आहे.
हे देखील वाचा – ‘बिग बॉस १७’चं घर आतून कसं असणार?, फोटो आले समोर, सेट उभारण्यासाठी दिवस-रात्र टीमची मेहनत
???????????????????????? ???????????????????????? ????????????????!#SalaarCeaseFire Worldwide Release On Dec 22, 2023.#Salaar #Prabhas #PrashanthNeel @PrithviOfficial @shrutihaasan @hombalefilms #VijayKiragandur @IamJagguBhai @sriyareddy @bhuvangowda84 @RaviBasrur @shivakumarart @vchalapathi_art @anbariv… pic.twitter.com/IU2A7Pvbzw
— Hombale Films (@hombalefilms) September 29, 2023
शुक्रवारी प्रभाससह निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘सालार’चे नवीन पोस्टर शेअर केले. ज्यामध्ये तो जबरदस्त लूकमध्ये दिसतो. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्याच्या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु असून या चित्रपटाबाबत चाहत्यांना मोठी उत्सुकता लागली. दरम्यान, एका चाहत्याने शाहरुखला डंकीच्या प्रदर्शनाबाबत विचारले. त्यावेळी चित्रपटाची तारीख ठरली असल्याचं तो म्हणाला होता. त्यामुळे ख्रिसमसमध्ये कोणता चित्रपट बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.