छोट्या पडद्यावरील बहुचर्चित कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘बिग बॉस’. ‘बिग बॉस’ शोचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. हा कार्यक्रम कधी सुरु होणार?, यामध्ये कोणते स्पर्धक सहभागी होणार? याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. आता प्रेक्षकांची ही उत्सुकता लवकरच संपणार आहे. ‘बिग बॉस १७’ लवकरच सुरु होणार आहे. याबाबत सध्या प्रत्येक दिवशी नवनवीन माहिती समोर येत आहे. आता हे घर आतून नेमकं कसं असणार? याविषयी चर्चा सुरु झाली आहे. ‘बिग बॉस’च्या नव्या घराचे फोटो समोर आले आहेत.
‘बिग बॉस १७’च्या सेटचं सध्या काम सुरु आहे. यंदाचा सेट खास असावा यासाठी विशेष तयारी सुरु आहे. शिवाय दिवस-रात्र या सेटसाठी संपूर्ण टीम मेहनत घेत आहे. ‘बिग बॉस’च्या घराचं काम करत असतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये एक बसही दिसत आहे. विशेष म्हणजे हा सेट तयार करण्यासाठी विविध रंगांचा वापर करण्यात येत आहे.
१५ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’च्या १७व्या सीझनला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच या कार्यक्रमाचे काही प्रोमोही प्रदर्शित करण्यात आले आहेत. या शोच्या प्रोमोंमध्ये सलमान विविध भूमिकांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच या शोमध्ये सहभागी होणारे स्पर्धक आणि शोची संपूर्ण संकल्पना वेगळी असणार असल्याचं बोललं जात आहे.
Bigg Boss 17 House Photos
— Bigg boss News (@biggboss17news) September 29, 2023
Recently, the casting director of the Salman Khan-hosted show, Aakash Sharma, shared a sneak peek into the construction of the house on Instagram. The pictures showcase the set's early stages, giving fans a glimpse of what to expect from the upcoming… pic.twitter.com/mFbL9y1vqW
गेल्या महिन्यापासूनच ‘बिग बॉस १७’च्या ऑडिशनला सुरुवात झाली होती. काही कलाकारांनी हा शो करण्यास नकार दिला. तर काहींनी या शोमध्ये सहभागी होण्यास होकार दिला आहे. अंकिता लोखंडे, ईशा मालविय, विवान डिसेना, युट्युबर हर्ष बेनीवाल यांसारख्या कलाकारांच्या नावाची शोसाठी चर्चा सुरु झाली आहे. आता नेमकं ‘बिग बॉस १७’मध्ये कोण सहभागी होणार? हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल.