शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : …अन् नाशिकमध्ये आजीबाईंनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे व चेतना भटचे धुतले पाय, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 6, 2023 | 2:27 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Prabhakar More and Chetna Bhat get a unique welcome in Nashik

Video : …अन् नाशिकमध्ये आजीबाईंनी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रभाकर मोरे व चेतना भटचे धुतले पाय, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवत आलेला. तुफान विनोदी स्किट्स व कलाकारांच्या अचूक टायमिंगचे चाहते दिवाने झाले. अभिनेते प्रभाकर मोरे व अभिनेत्री चेतना भट या कार्यक्रमामुळे आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहे. दोघांनी कार्यक्रमात विविध पात्र साकारत प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. त्यामुळेच ते जेव्हा विविध कार्यक्रमांना जातात, तेव्हा चाहते त्यांचं आदरातिथ्य करताना दिसतात. अशात या कलाकारांचा आदरातिथ्य करतानाचा एक व्हिडीओ समोर आला, जे पाहून नेटकरी भारावले. (Prabhakar More and Chetna Bhat get a unique welcome in Nashik)

नुकतेच प्रभाकर मोरे व चेतना भट हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिकला आले होते. त्यावेळी ते विश्रांतीसाठी एका हॉटेलमध्ये थांबले असता त्या हॉटेलच्या मालकांनी स्वागत करत त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी त्यांचं स्वागत करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यावेळी दोघांनी जी कृती केली, ते पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

हे देखील वाचा – कुणीतरी येणारं येणारं गं!, ‘भागो मोहन प्यारे’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, डोहाळ जेवणाचे सोशल मीडियावर व्हायरल

प्रभाकर व चेतना यांचा नाशिकमध्ये एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर परतीच्या प्रवासाला निघाले असताना ते दोघे विश्रांतीसाठी एका हॉटेलमध्ये आले होते. यावेळी हॉटेलमधील एका आजीने त्यांचं पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये, हॉटेलमधील एका महिलेने प्रभाकर व चेतना यांचं पाय धुताना दिसले. पुढे त्या दोघांचं ताट ओवाळून औक्षण केले. हॉटेलने केलेलं त्यांचं स्वागत पाहून ते इतके भारावले की, पुढे त्यांनी त्या आजींच्या पाया पडत आशीर्वाद घेतले. चेतनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीजवर शेअर केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केलं आहे.

हे देखील वाचा – “समोरच्याचा अपमान…”, ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी पुन्हा एकदा सुनावलं, म्हणाल्या, “अनफॉलो करा पण…”

अभिनेते प्रभाकर मोरे यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमामध्ये विविध पात्र साकारली. ज्यात ते त्यांच्या विनोदी शैलीने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकली आहे. त्यांचा ‘शालू झोका दे गो मैना…’ गाण्यावरील डान्स प्रचंड गाजला असून ते चाहत्यांसह अनेकदा थिरकतानाही दिसले. केवळ ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नव्हे, तर ‘पांघरुण’, ‘टकाटक’, ‘भाई-व्यक्‍ती की वल्ली’ यांसारखे चित्रपट व ‘रानबाजार’ या वेब सीरिजमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. याआधीही प्रभाकर यांचा चाळीतील चाहत्यासह डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्याची जोरदार चर्चा रंगली होती. तर चेतनाने देखील कार्यक्रमातील विविध पात्रांमधून रसिक प्रेक्षकांना हसवले आहे. तसेच, तिच्या सोशल मीडियावरील पोस्टची बरीच चर्चा होत असते.

Tags: chetana bhatmaharashtrachi hasya jatraprabhakar morePrabhakar More and Chetna Bhat get a unique welcome in Nashik
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
, randeep hooda is marrying long time girlfriend

दहा वर्षांनी लहान असलेल्या गर्लफ्रेंडबरोबर विवाहबंधनात अडकणार रणदीप हुड्डा, कोण आहे अभिनेत्याची होणारी बायको?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.