बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुणीतरी येणारं येणारं गं!, ‘भागो मोहन प्यारे’ फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, डोहाळ जेवणाचे सोशल मीडियावर व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 6, 2023 | 1:14 pm
in Entertainment
Reading Time: 5 mins read
google-news
Sarita Mehendale Pregnant

कुणीतरी येणारं येणारं गं!, 'भागो मोहन प्यारे' फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, डोहाळ जेवणाचे सोशल मीडियावर व्हायरल

मराठी मनोरंजन विश्वातील अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी त्यांच्या चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. काही अभिनेत्री सध्या त्यांच्या मातृत्वाचा आनंद उपभोगत आहेत. सोशल मीडियावरून ते त्यांच्या मातृत्वपणाचा आनंद शेअर करताना दिसत आहेत. अशातच आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावरून आई होणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. ‘भागो मोहन प्यारे’ या मराठी मालिकेतील एका अभिनेत्रीने ही गुडन्यूज शेअर केली आहे. या मालिकेतील अभिनेत्री सरिता मेहेंदळेने अलीकडेच ही आनंदाची बातमी दिली आहे. (Sarita Mehendale Pregnant)

सरिताने तिच्या डोहाळे जेवणाचे काही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. सरिताने तिचा नवरा सौरभ जोशीबरोबरचे फोटो शेअर करत गरोदर असल्याची गुडन्यूज दिली. त्यांनी शेअर केलेल्या फोटोवरून सरिता व सौरभच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला मिळतोय. या फोटोंमध्ये सरिता तिचा बेबी बम्प फ्लाँट करताना दिसतेय. पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने साजरा केलेल्या डोहाळ जेवणाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

आणखी वाचा – “समोरच्याचा अपमान…”, ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्या नारकरांनी पुन्हा एकदा सुनावलं, म्हणाल्या, “अनफॉलो करा पण…”

View this post on Instagram

A post shared by meSarita (@saritamehendalejoshi)

फुलांच्या दागिन्यांमध्ये सजलेला सरिताचा लूक खास दिसतोय. सरिता व सौरभसह त्यांच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही स्पष्ट दिसत आहे. सरिताच्या डोहाळ जेवणादिवशी सिनेसृष्टीतील काही कलाकार मंडळींनीही हजेरी लावली होती. सरिताच्या डोहाळ जेवणाच्या फोटोंवर सिनेविश्वातील कलाकार मंडळी व चाहत्यांसह अनेकांनी कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – “तेच तेच रडगाणं…”, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मध्ये जयदीप-गौरीचा पुनर्जन्म, प्रेक्षक संतापले, म्हणाले, “हात जोडतो पण…”

View this post on Instagram

A post shared by meSarita (@saritamehendalejoshi)

अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आजवर तिने अनेक मालिकांमधून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘भागो मोहन प्यारे’ मालिकेतील मधुवंती ही तिची भूमिका विशेष लोकप्रिय झाली होती. ‘सरस्वती’ या मालिकेतून सरिताने मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. काही काळापासून सरिताने सिनेसृष्टीपासून ब्रेक घेतला आहे. तसेच आता सरिताने तिच्या आयुष्यातील खास प्रवासाला सुरुवात केली आहे.

Tags: bhago mohan pyareentertainmentmarathi actresssarita mehendale
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Urmila Nimbalkar Post

"अचानक एका बाईंनी मागून अथांगला पकडलं अन्…", उर्मिला निंबाळकरने सांगितला लेकाबरोबर घडलेला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, "इच्छेविरुद्ध ओढून त्याचे…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.