टेलिव्हिजनवरील ‘शक्तिमान’ ही मालिका आज इतके वर्ष उलटून गेली तरीही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. या मालिकेमध्ये शक्तिमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. तसेच त्यांनी महाभारत या मालिकेमध्ये भीष्म पितामह यांची भूमिका साकारली आहे. आजही ते प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसतात. ते आता ६६ वर्षांचे आहेत. मात्र आजवर त्यांनी लग्न केले नाही. त्यांनी लग्न का केले नाही? असा प्रश्न अनेकदा चाहते त्यांना विचारतात. मात्र त्यांनी यावर कोणतेही उत्तर चाहत्यांना दिले नव्हते. अशातच आता मुकेश अजून अविवाहित का? असे प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडले. याचे कारण आता आपण जाणून घेऊया. (mukesh kahnna on marriage)
मुकेश सोशल मीडियावर अधिक सक्रिय असतात. ते अनेक विषयांवर आपले मतदेखील व्यक्त करत असतात. लवकरच ते नवीन पिढीसाठी पुन्हा एकदा ‘शक्तिमान’ ही मालिका घेऊन येत असल्याचे पोस्ट करत जाहीर केले होते. ही घोषणा होताच त्यांचे अनेक चाहते खुशदेखील झाले. मात्र त्यांच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर खासगी आयुष्यामुळेदेखील अधिक चर्चेत आले आहेत. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या मुकेश यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्यांनी लिहिले की, “एक भीष्म प्रतिज्ञा कोणाचे लग्न थांबवू शकते का? लोकांना वाटते की माझ्याबरोबर असे झाले आहे. मी असा विचार करत नाही. लग्न म्हणजे दोन मनं एकत्र येतात. पण आजवर मला अशी व्यक्ती भेटली नाही. कदाचित भविष्यात मिळेल”.
नंतर मुकेश यांनी एका मुलाखतीमध्येदेखील लग्न न करण्यामागील कारण सांगितलं. ते म्हणाले की, “मी लग्न करण्याचया विरोधात नाही. पण लोक म्हणतात की भीष्म पितामहची भूमिका साकारल्यानंतर मीदेखील त्यांच्यासारखे वागत आहे. पण मला लग्न करायचे असेल तर ते होईल. आता माझ्यासाठी कोणती मुलगी जन्माला येणार नाही. माझे लग्न हा माझा खासगी प्रश्न आहे. माझी कोणीही पत्नी नाही. मी लग्नाच्या विरोधातदेखील नाही.
दरम्यान ‘शक्तिमान’ परत येत असल्याचे संकेत मुकेश खन्ना यांनी दिले आहेत. रविवारी मुकेश खन्ना यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘शक्तिमान’ परत येणार असल्याचं सूचित केलं आहे. मुकेश खन्ना यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक जुना फोटो आणि एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यावर खूप चर्चा सुरु आहे.