Navri Mile Hitlerla Serial : झी मराठी वाहिनीवरील लीला आणि एजे यांची हटके कथा असलेली ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे. मालिकेत येणाऱ्या अनेक ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. त्यामुळे ही मालिका बघण्यात प्रेक्षकांना आणखी रस निर्माण होऊ लागला आहे. मालिकेत नुकतंच लीला व एजे यांची दिवाळी साजरी होतानाचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले. सगळं काही नीट चालेलेलं असताना आणि एजे व लीला यांच्यात आता कुठे तरी प्रेम बहरत असतानाच एजेंवर मोठं संकट आलं आणि हे संकट म्हणजे एजेंची अटक. (Navri Mile Hitlerla Serial Updates)
रेवती एजेला भाऊबीजेच्या भेटीमध्ये लीलाची काळजी घेण्यासाठी आणि ती आनंदात कशी राहील यासाठी प्रयत्न करण्याचं वचन मागते. इकडे श्वेता एजेंसमोर विष प्यायल्याचं नाटक करते, ज्यामुळे एजेला अटक होते. ही बातमी कळताच लीला ठरवते की ती काहीही करून एजेची सुटका करणार. लीला रात्रभर पोलीस ठाण्याबाहेर थांबते. ती ठरवते की श्वेताविरुद्ध सगळे पुरावे गोळा करायचे आणि एजेची सुटका करायची. ती रुग्णालयात जाऊन श्वेताला भेटते आणि सरोजिनीच्या मदतीने श्वेताशी डील करण्याचा प्रयत्न करते. अशातच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे आणि या नवीन प्रोमोमधून लीला एजेला बाहेर काढणार असल्याचे म्हणत आहे.
आणखी वाचा – अंध चाहतीने गायलं गाणं, उत्कर्ष शिंदेने शेअर केली डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट, म्हणाला, “माइकला हात लावताच…”
या नवीन प्रोमोमध्ये लीला एजेला भेटण्यासाठी तुरुंगात जाते. यावेळी ती “माझा नवरा निर्दोष आहे आणि हे मी सिद्ध केल्याशिवाय गप्प बसणार नाही. तुमची काहीही चूक नाही आणि मी काहीही करुन तुला यातून बाहेर काढणार”. यानंतर एजेला तिचं त्यांच्यावर प्रेम असल्याचे सांगते. यावेळी ती “मी तुमच्या कुटुंबाचाच भाग आहे मला पण तुमची काळजी आहे” असं म्हणते. आजचा दिवस तुम्ही जेलमध्ये काढा मी तुम्हाला उद्या बाहेर काढेन” असं म्हणते. लीला लीला श्वेताला जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाते. त्यानंतर श्वेता आम्ही हे फक्त एजेंना अटकवण्यासाठी करत असल्याचे लीलाला म्हणते.
आणखी वाचा – अतुल कुलकर्णींच्या गाजलेल्या ‘बंदिश बँडिट्स’ सीरिजचा नवीन सीझन चाहत्यांच्या भेटीला, कधी व कुठे पाहता येणार?
दरम्यान, श्वेताच्या या जाळ्यातून एजे कसं सुटणार? त्यांना वाचवण्यात लीलाला यश मिळेल का? श्वेताचा हा डाव तिच्यावरच उलटणार का? लीला एजेंची निर्दोष मुक्तता करु शकेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.