Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व विशेष गाजले ते म्हणजे अरबाज आणि निक्की यांच्या नात्यामुळे. अरबाज कमिटेड असूनही तो निक्कीबरोबर जवळीक साधत होता. त्यांच्यात मैत्रीपलीकडच्या नात्याचे वारे वाहत होते. ‘बिग बॉस’च्या घरात अरबाज निक्कीसाठी अनेकदा भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. तसंच तो तिच्यासाठी अनेकदा आक्रमकही झाला. त्यानंतर त्याने घरातून निरोप घेतला तेव्हा निक्की पूर्णत: कोलमडून गेली होती. अशातच शनिवारच्या भागात घरात ‘बिग बॉस’चे माजी स्पर्धक घरातील अंकिता, अभिजीत, सूरज, डीपी, जान्हवी व निक्की यांना भेटायला आले होते. यावेळी अरबाजही भेट घेण्यास आला होता. (Bigg Boss Marathi 5 Daily Updates)
शनिवारी झालेल्या रियुनियन पार्टीला निक्की-अरबाज एकमेकांसमोर आले. दरवाजातून आत आल्यावर अरबाज निक्कीला उचलून घेऊन थेट बेडरुम एरियामध्ये घेऊन गेला आणि यावी तो प्रचंड भावुकही झाला. यादरम्यान, त्याने निक्कीला विश्वासात घेत त्याच्याबद्दल तिच्या मनात असलेल्या सर्व शंकांचे निरसन केले. माझ्याविषयी सर्व काही अफवा पसरवल्या गेल्या असून माझा साखरपुडा वगैरे काही झाला नाहीय आणि मी माझे ते जून नातेदेखील संपवले असल्याचे त्याने तिला सांगितलं.
आणखी वाचा – नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रवि योगाचा शुभ संयोग, कर्क व कुंभ राशीच्या लोकांना मिळणार नाशिबाची साथ
याबद्दल अरबाज निक्कीला पुढे म्हणालं की, “बघ… मी तुला सांगितलं होतं ना बाहेर ‘कमिटेड’ आहे वगैरे… जे काही होतं ते सगळं मी बाहेर जाऊन संपवलेलं आहे. मी एक शो करून आता ‘बिग बॉस’मध्ये आलो होतो. त्यामुळे माझ्याबद्दल खूप अफवा पसरल्या आहेत. माझे काही असंख्य अफेअर्स वगैरे नाहीयेत. मी बाहेर जाताना पण सर्वांना सांगत होतो की, तुझी काळजी घ्या. मी तुझी खूप वाट बघतोय. मी फेक वागलो असतो तर तुला ते दिसलं असतं”.
आणखी वाचा – Bigg Boss 18 मध्ये अनिरुद्धाचार्य येणार?, सेटवरील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, प्रेक्षक म्हणाले, “सेलिब्रिटी बाबा…”
यांतर निक्कीलाही त्याच्या बोलण्यावर विश्वास बसतो आणि ते किचन एरियामध्ये असताना निक्की त्याच्याबद्दलच्या निर्णय सांगते. यावेळी जान्हवीही तिला असं म्हणते की, “मी तिला म्हटलं होता की तू कोणत्याही निर्णयावर जाऊ नको. कारण इथे आपण काही ठरवू नाही शकत.” तेव्हा निक्की असं म्हणते की, “मी ठरवलं होतं की मी याच्याशी काही बोलणार नाही, पण आता याने येऊन सर्व क्लिअर केलं आहे. त्यामुळे मी आता एक निर्णय घेत आहे की मला आता तूच पाहिजे”. यानंतर जान्हवी दोघांनाही “आता तरी मतांवर तुम्ही ठाम रहा” असं म्हणते.