रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मालिकांमध्ये काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्याला ३१व्या वर्षी हृदयविकाराचा झटका, म्हणाला, “कोणालाच सांगितलं नाही कारण…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 21, 2024 | 5:25 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
mohsin khan heartattack

'ये रिश्ता...' फेम कार्तिक म्हणजेच मोहसीन खानला हृदयविकाराचा झटका

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेला आजवर खूप पसंती मिळाली आहे. या मालिकेने दीर्घ काळापासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. अक्षरा-नैतिक ही जोडी तर आजही सगळ्यांच्या मनात घर करुन आहेत. अक्षराची भूमिका साकारलेल्या हिना खानच्या तब्येतीबद्दलच्या अनेक अपडेट्स समोर येत आहेत. हिनाला स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. सध्या त्यावर तिचे उपचार सुरु असून तिचे अनेक व्हिडीओ व फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अशातच आता या मालिकेमध्ये कार्तिक ही भूमिका साकारणाऱ्या ३२ वर्षीय मोहसीन खानबद्दल एक अपडेट समोर आली आहे. (mohsin khan heartattack)

मोहसीनने नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्याने मागील वर्षी हृदयविकाराचा झटका आल्याचे त्याने सांगितले आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे ऐकून मोहसीनच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र मोहसीनने आता एकदम फिट असल्याचेदेखील सांगितले आहे.

आणखी वाचा – Badlapur School Sexual Abuse Case : “चौकात लिंग कापून…”, बदलापूर प्रकरणी कलाकारांचं सरकारडे साकडं, म्हणाले, “यांना दगडाने ठेचून…”

View this post on Instagram

A post shared by Mohsin Abdul Waheed Khan (@khan_mohsinkhan)

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मोहसीन म्हणाला की, “माझे फॅटी लिव्हर झाले होते त्यामुळे गेल्या वर्षी सौम्य हृदयविकाराचा झटका आला होता. पण मी याबद्दल कोणालाही काहीही सांगितले नाही. मी काही दिवसांसाठी रुग्णालयातदेखील भरती झालो होतो. त्यानंतर माझ्यावर उपचार झाले, दोन-तीन रुग्णालयेदेखील बदलली. उपचार घेतल्यानंतर मी बरा झालो. आता सगळं आटोक्यात आहे”.

आणखी वाचा – श्रद्धा कपूरचा नवा रेकॉर्ड, पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही टाकलं मागे, नक्की काय घडलं?

पुढे त्याने सांगितले की, “तब्येत बिघडल्यामुळे माझ्या रोगप्रतिकारक शक्तीवर खूप परिणाम झाला होता. त्यामुळे मी सारखा आजारी असायचो”. तसेच फॅटी लिव्हरचे कारण विचारले असता त्याने सांगितलं की, “याला नॉन अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर म्हणतात. मद्यपान न करता हे होऊ शकते. झोपण्याचे वेळापत्रकदेखील व्यवस्थित नसेल तरीही ही समस्या येऊ शकते”. दरम्यान ‘ये रिश्ता…’ या मालिकेबरोबरच ‘लव्ह बाय चान्स’, ‘मेरी आशिकी तुमसे ही’, ‘निशा और उसके कजन्स’, ‘ड्रीम गर्ल’ व ‘प्यार तुने क्या किया’ या मालिकेमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकरल्या आहेत.  आता तो अभिनयक्षेत्रापासून दूर असलेला पाहायला मिळत आहे.

Tags: Heart Attackmohsin khanYeh Rishta Kya Kehlata Hai
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 daily update Megha Dhade shared an angry post on Janhavi Killekar insulted Paddy aka Pandharinath Kamble

Bigg Boss Marathi : “तुझी लायकी काय?, झक मारुन…”, जान्हवीने पॅडीचा अपमान केल्यानंतर मराठी अभिनेत्रीने कठोर शब्दांत सुनावलं, म्हणाली, “तुझं तोंडच…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.