टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ ही मालिका अधिक लोकप्रिय आहे. या मालिकेतील सर्वच भूमिकांना प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले आहे. यातील एक महत्त्वाची भूमिका म्हणजे मी.सोढी ही आहे. ही भूमिका अभिनेता गुरुचरण सिंहने साकारली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी गुरुचरण अधिक चर्चेत आले होते. ते त्यांच्या राहत्या घरातून २५ दिवस बेपत्ता झाले होते. मात्र ते नक्की कुठे गेले, कुठे राहिले याबद्दल कोणालाही काहिही माहिती नव्हती. ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांच्या वडिलांनी याबद्दल माहिती दिली. (gurucharan singh on producers)
काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार गुरुचरण पुन्हा एकदा मालिकेमध्ये दिसतील अशा चर्चा सुरु होत्या. मात्र निर्माते असित मोदी यांनी स्वतः खुलासा करत असे काहीही नसल्याचे स्पष्ट केले. मालिका सुरु झाल्यापासूनच गुरुचरण यामध्ये भूमिका साकारत होते. मात्र २०१२ साली त्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. कॉन्ट्रॅक्टबद्दल काहीही बोलणं न करता निर्मात्यांनी हा निर्णय घेतला असे अभिनेत्याने बोलताना सांगितले.
गुरुचरण यांनी सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीमध्ये या सर्व प्रसंगाबद्दल सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, “ ‘तारक मेहता…’ या मालिकेतील सर्व टीम ही माझ्या कुटुंबासारखी होती. त्यावेळी मालिकेतील कॉन्ट्रॅक्ट व करार यासंदर्भात चर्चा सुरु होती. माझी भूमिका दुसरा अभिनेता साकारणार आहे याबद्दल मला काहीही सांगितलं नव्हतं. मी तेव्हा दिल्लीमध्ये माझ्या कुटुंबीयांबरोबर होतो”.
पुढे त्यांनी सांगितलं, “त्यावेळी धर्मेंद्रजी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मालिकेत आले होते. त्यावेळी नवीन सोढीची एंट्री पाहायला मिळाली होती. मी जेव्हा ते सगळं पाहिलं तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी माझ्या आई-वडिलांनादेखील धक्का बसला होता. माझे दर्शकदेखील खूप निराश झाले होते. तसेच अनेक जण मालिका का सोडली? असंदेखील सगळेजण विचारु लागले होते”. दरम्यान आता मालिकेचे निर्माते यावर कोणती प्रतिक्रिया देतात हे आता पाहण्यासारखे आहे.