बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महादेवांना म्हणतो पप्पा तर मरीमातेला आई, Bigg Boss च्या घरातील खरा सूरज नक्की कसा?, पुरुषोत्तम म्हणाले, “तो चिडतो पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 14, 2024 | 1:51 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
bigg boss marathi season 5 Purushottam Dada Patil On Suraj Chavan

कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सूरज चव्हाणचं भरभरुन केलं कौतुक, पाठिंबाही दर्शविला

‘बिग बॉस मराठी’च्या सीजन ५ मधून पहिला स्पर्धक घराबाहेर पडला तो म्हणजेच कीर्तनकार पुरुषोत्तम दादा पाटील. पुरुषोत्तम दादा पाटील यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास हा पहिल्याच आठवड्यात संपला आणि त्यांना घराबाहेर पडावं लागलं. मात्र त्यामुळे त्यांचा तितकाचा खेळ पाहायला मिळाला नाही, असं असलं तरी अगदी घरातून निघताना शेवटच्या क्षणाला त्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संतांचा जयजयकार पाहून त्यांनी अनेकांची मन जिंकली. सोशल मीडियावरुन त्यांच्या या कृतीच बरंच कौतुकही करण्यात आलं. पुरुषोत्तम दादा पाटील सध्या घराबाहेर पडले असून त्यांनी नुकतीच ‘रेडिओ सिटी मराठी’ला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी घरातील सर्व स्पर्धकांच्या स्वभावाबाबत भाष्य केलं. (Purushottam Dada Patil On Suraj Chavan)

पुरुषोत्तम दादा पाटील यांना जेव्हा सूरज चव्हाणबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की, सूरजबद्दल किती बोलावं हे कमीच. मी त्याच्याबद्दल एक तासही सलग बोलू शकतो कारण तो खूप निर्मळ मनाचा आणि साधा भोळा आहे. त्याच्या मनात कोणतंच कपट नाही. सूरजला सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर सूरजच्या नावाची बरीच चर्चा सुरु असलेली पाहायला मिळते. ‘बिग बॉस’मुळे सूरज चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र सूरजला पाठिंबा मिळताना पाहायला मिळत आहे. अशातच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी देखील ‘बिग बॉस’च्या घरात त्यांच्या जवळची व्यक्ती म्हणून सूरजचा उल्लेख केलेला पाहायला मिळाला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : निक्की-अरबाजने मालवणी भाषेला मराठी भाषा नाही म्हणताच प्रेक्षकांचा राग अनावर, म्हणाले, “स्वतः नीट बोलत नाही आणि…”

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

‘रेडिओ सिटी मराठी’ या वाहिनीला मुलाखत देतानाच पुरुषोत्तम दादा पाटील यांनी सुरज बद्दल असं भाष्य केलं की, “संपूर्ण महाराष्ट्र सूरजवर प्रेम करत आहे. सूरज खूप निर्मळ मनाचा मुलगा आहे. मी स्वतः त्याला अनुभवलं आहे. मराठमोळ्या मातीशी नाळ असलेला आणि मनाने तो भावुक आहे. त्याच्या मनात कोणाबाबद्दल कपट नाही आहे. थोडाफार तो चिडलेला दिसतो पण ते थोड्यापुरतं आहे. आम्ही सर्वच सदस्य आयुष्याच्या एका एका टप्प्यावर आलो आहोत पण सूरजची ही सुरुवात आहे. आणि महाराष्ट्राने त्याला या त्याच्या प्रवासात उत्तम साथ दिली आहे. महादेवांना तो पप्पा म्हणतो. त्याला आई-वडील नाही आहेत. महादेव पप्पा तर मरीमाता ही त्याची कुलदैवत आहे ती त्याची आई आहे”.

आणखी वाचा – Video : मिठाई, विविध पदार्थ, समोसा-वडापाव अन्…; खुशबू तावडेचं असं झालं डोहाळे जेवण, बहीण तितीक्षाने पुरवले लाड

पुढे ते म्हणाले, “त्याच्याविषयी मी तासभरही बोलू शकतो. तो सगळ्यांचं मन राखतो. घरामधील प्रत्येक ड्युटी तो प्रामाणिकपणे करतो. तो मला म्हणतो, दादा मला तुम्ही लग्नासाठी मुलगी पाहाल ना?. यावर मी त्याला पाहतो असं म्हटलं. तेव्हा तो म्हणाला, मला आई नाही तर तिला सासूचा जाच होणार नाही. तर वडील नाही तर सासऱ्यांचा जाच होणार नाही. तिने मला सांभाळावं आणि माझं युट्युब, इन्स्टाग्राम पाहावं. इतका तो गोड आहे”, असं म्हणत त्याच खूप कौतुक केलं.

Tags: bigg boss marathi season 5Purushottam Dada Patil On Suraj ChavanSuraj Chavan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Tula Shikvin Changlach Dhada zee marathi serial update charulata enter in suryawanshi house new promo viral on social media

Tula Shikvin Changlach Dhada : अधिपतीच्या खऱ्या आईचा घरात प्रवेश, तर चारूहास त्याचवेळी आत्महत्या करण्यास गेले अन्…; भूवनेश्वरीची खेळी की आणखी काही?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.