शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वडिलांना हृदयविकाराचा झटका, कामच सोडावं लागलं अन्…; ‘तारक मेहता…’च्या सोनूवर कमी वयातच आलेली जबाबदारी, आता कसं आहे आयुष्य?

Shamal Sawantby Shamal Sawant
नोव्हेंबर 22, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
jheel mehta father heart attack

झील मेहताच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सगळंच बदलल

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. झील मेहता तिचा बालपणीचा मित्र आदित्यशी लग्न करणार आहे. झील मेहता गुजराती आणि आदित्य उत्तर भारतीय ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं लग्न दोन वैदिक पद्धतीने होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता तिच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. झील तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. २००८ साली तिने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमध्ये सोनू भिडे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१२ पर्यंत ती या भूमिकेत दिसून आली. २०१९ साली तिच्या आयुष्यात असा प्रसंग घडला ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. (jheel mehta father heart attack)

‘तारक मेहता…’ मालिकेनंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळाली. मात्र २०१९ साली झीलच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिने तिची सर्व स्वप्न, प्रोजेक्ट सगळं काही सोडून दिलं. ‘तारक मेहता…’ सोडून तिला आता १२ वर्ष झाली आहेत. पण आजही तिला सोनू भिडे या भूमिकेमुळेच अधिक ओळखले जाते. मात्र तिने नंतर उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला.

आणखी वाचा – खिशाला परवडणाऱ्या किंमतीत एकापेक्षा एक हटके Readymade ब्लाऊज, अप्रतिम डिझाईनही तयार करुन मिळणार, पाहा Inside Video

View this post on Instagram

A post shared by Jheel Mehta (@jheelmehta_)

तिने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ बरोबर बोलताना सांगितले की, “मी काही जाहिराती केल्या होत्या. पण माझ्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला तेव्हा सगळं बदललं”.  मी माझं सगळं काम सोडून वडिलांची त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. नंतर मी माझे सगळं लक्ष व्यवसायात देण्याचे ठरवले आणि अभिनयापासून लांब आले”.

आणखी वाचा – दुसऱ्यांदा आई होणार सना खान, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज, सोशल मीडियाद्वारे कौतुकाचा वर्षाव

नंतर ती म्हणाली की, “मी २००८ साली या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. मी खूप लहान होते. पण मला लोक ओळखू लागले होते. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा हा कधी ना कधी शेवट असतोच. त्यामुळे मी २०१२ साली मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं पण हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचंदेखील होतं”.   दरम्यान आता झील २८ डिसेंबर २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.

Tags: actressjheel MehtaTaarak mehata ka ooltah chashamah
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
shaka laka boom boom fame kinshuk vaidya marriage

'शाका लाका बूम बूम'मधील संजूला लागली हळद, लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.