Sana Khan Pregnancy Announcement : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री सना खानने चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. अभिनेत्री दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुडन्यूज तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. लग्नानंतर अभिनेत्रीने अभिनय क्षेत्र सोडलं असून ती संसारात रमली आहे. अभिनय सोडून ती पती आणि कुटुंबाची काळजी घेत आहे. सना खानने २१ नोव्हेंबर २०२० रोजी सुरत येथे इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती अनस सईद यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर तिने चित्रपट जगताला अलविदा केला. यानंतर आता अभिनेत्रीने दुसऱ्यांदा आई होणार असल्याचं समोर आलं आहे.
सनाने इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही आनंदाची बातमी दिली आहे. पोस्टसह कॅप्शनमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “अलहमदुलिल्लाह. हे अल्लाह, मला तुझ्या शक्तीपासून एक चांगली संतती दे. खरंच, प्रार्थना ऐकणारा तूच आहेस. हे अल्लाह आम्हांला आमच्या जोडीदाराकडून आणि आमच्या मुलांकडून डोळ्यांचे सांत्वन दे आणि आम्हाला ईश्वरभक्तांचे प्रमुख बनव. केवळ अल्लाहकडे अशी भेट देण्याची शक्ती आहे आणि प्रामाणिक प्रार्थनांना तो नक्कीच प्रतिसाद देतो. आम्हाला अशा कुटुंबाचा आशीर्वाद द्या जो केवळ संख्येनेच नाही तर सद्गुणातही वाढ करेल. अल्लाह आमच्या प्रार्थना स्वीकारा आणि सर्व सुरळीत करा”, असं म्हटलं आहे.
सना व अनस यांची पहिली भेट २०१७ मध्ये मक्का येथे झाली होती. या भेटीत अनसने सनाला बीजी म्हणजेच मोठी बहीण असे संबोधले. मक्केत भेटल्यानंतर दोघेही बऱ्याच दिवसांनी पुन्हा भेटले. या भेटीनंतर अनस सनाच्या प्रेमात पडला. अनस सईद सनाला अनेक मॅसेज व कॉल पाठवत असे, ज्याकडे ती दुर्लक्ष करत होती. याबाबत त्यांनी मौलवींशी चर्चा केली. मौलवींनी सनाला अनसशी लग्न करण्याचा सल्ला दिला. तिने मौलवींच्या सल्ल्याचे पालन केले आणि अनसशी लग्न करण्यास होकार दिला. विशेष म्हणजे अनस सनापेक्षा सात वर्षांनी लहान आहे.
सना खानने लग्नानंतर फिल्मी जगताचा निरोप घेतला. मुफ्ती अनस यांनी सना खानला लग्नासाठी खास हिऱ्याची अंगठी भेट म्हणून दिली. सना वअनस यांना एक मुलगाही आहे. दोघांनीही त्यांच्या मुलाचे नाव त्यांच्या मौलानाच्या नावावर ठेवले आहे, त्याचे नाव तारिक जमील आहे. अनस सईद हे इस्लामिक विद्वान आहेत पण ते एक चांगले व्यापारी आहेत. मुफ्ती अनस सय्यद आणि त्यांचे कुटुंब हे हिरे व्यापारी आहेत. सय्यद अनस यांनी सुरतमध्ये २० कोटी रुपयांचा महाल बांधला आहे. त्यांची भारताबाहेरही ५० कोटींची संपत्ती आहे.