‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा मालिकेतील सोनूची भूमिका साकारणारी अभिनेत्री झील मेहता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. झील मेहता तिचा बालपणीचा मित्र आदित्यशी लग्न करणार आहे. झील मेहता गुजराती आणि आदित्य उत्तर भारतीय ब्राह्मण असल्यामुळे त्यांचं लग्न दोन वैदिक पद्धतीने होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता तिच्या घरी लगीन घाई सुरु झाली आहे. झील तिच्या खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत राहिली आहे. २००८ साली तिने ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या मालिकेमध्ये सोनू भिडे म्हणून काम करण्यास सुरुवात केली. २०१२ पर्यंत ती या भूमिकेत दिसून आली. २०१९ साली तिच्या आयुष्यात असा प्रसंग घडला ज्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. (jheel mehta father heart attack)
‘तारक मेहता…’ मालिकेनंतर ती अभिनय क्षेत्रापासून दूर असलेली पाहायला मिळाली. मात्र २०१९ साली झीलच्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला. त्यानंतर तिचं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. तिने तिची सर्व स्वप्न, प्रोजेक्ट सगळं काही सोडून दिलं. ‘तारक मेहता…’ सोडून तिला आता १२ वर्ष झाली आहेत. पण आजही तिला सोनू भिडे या भूमिकेमुळेच अधिक ओळखले जाते. मात्र तिने नंतर उद्योजिका बनण्याचा निर्णय घेतला.
तिने ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ बरोबर बोलताना सांगितले की, “मी काही जाहिराती केल्या होत्या. पण माझ्या वडिलांना हृदय विकाराचा झटका आला तेव्हा सगळं बदललं”. मी माझं सगळं काम सोडून वडिलांची त्यांच्या व्यवसायामध्ये मदत करण्यास सुरुवात केली. नंतर मी माझे सगळं लक्ष व्यवसायात देण्याचे ठरवले आणि अभिनयापासून लांब आले”.
नंतर ती म्हणाली की, “मी २००८ साली या मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला. मी खूप लहान होते. पण मला लोक ओळखू लागले होते. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीचा हा कधी ना कधी शेवट असतोच. त्यामुळे मी २०१२ साली मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मला माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. हा निर्णय घेणं खूप कठीण होतं पण हा निर्णय घेणं खूप महत्त्वाचंदेखील होतं”. दरम्यान आता झील २८ डिसेंबर २०२४ रोजी लग्नबंधनात अडकणार आहे.