टेलिव्हिजनवर लहान मुलांच्या आवडीच्या अनेक मालिका प्रसारित केल्या जातात. शाळेतून आलं आणि दप्तर टाकलं की सगळी मुलं ही टीव्ही चालू करुन आवडत्या मालिका पाहण्यास सुरुवात करतात. लहानपणी पाहिलेल्या मालिका सगळ्यांच्याच लक्षात असतात. अशातच आतापर्यंत सगळ्यांच्या आठवणीत राहिलेली मालिका म्हणजे ‘शाका लाका बूम बूम’. २००० साली सुरु झालेल्या मालिकेने सर्वच वयोगटातील प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली. जादुई पेन्सिलच्या दुनियेत सगळ्यांचीच मन रमली जात होती. या मालिकेत मुख्य भूमिका सकारणारा संजू म्हणजेच किंशुक वैद्य हा चांगलाच चर्चेत राहिला. (shaka laka boom boom fame kinshuk vaidya engagement)
आता पुन्हा एकदा किंशुक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा नुकताच साखरपुडा पार पडला. सोशल मीडियावर त्याचे फोटोदेखील व्हायरल झाले आहेत. ३३ वर्षांच्या किंशुकच्या साखरपुड्याच्या वृत्ताने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. किंशुकने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक फोटों शेयर केला आहे. यामध्ये तो व त्याची होणारी बायको दिसून येत आहे. यामध्ये ते साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहेत. किंशुकने निळ्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला असून त्याच्या होणाऱ्या बायकोने निळ्या रंगाची साडी नेसली आहे.
किंशुक याआधी टेलिव्हीजन अभिनेत्री शिव्या पठानियाला डेट करत होता. २०२१ साली दोघांचाही ब्रेकअप झाल्याचेदेखील समोर आले होते. त्याच्या होणाऱ्या पत्नीबद्दल सांगायचे झाले तर तो आता दीक्षा नागपालबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. ती नृत्यदिग्दर्शिका असून ‘पंचायत २’ मधील एका गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे.
तसेच किंशुकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर त्याने ‘वो तो है अलबेला’ या कार्यक्रमामध्ये दिसून आला होता. त्याच्या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. याशिवाय ‘वो अपना सा’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, जात ना पुछो प्रेम की’ व ‘कर्ण संगिनी’ या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.