रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

जगप्रसिद्ध गायक जस्टिन बीबर झाला बाबा, घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2024 | 11:23 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Justin Bieber Blesssed With Baby Boy

गायक जस्टिन बीबरने दिली गुडन्यूज, बाबा झाल्याचे सांगत शेअर केली पोस्ट, चिमुकल्याचे नावही सांगितले

Justin Bieber Blesssed With Baby Boy : जगातील लोकप्रिय पॉप गायक जस्टिन बीबर आणि मॉडेल हेली बीबर अखेर आई-वडील झाले आहेत. चिमुकल्याच्या येण्याने बीबर कुटुंबात आनंद पसरला आहे. गायकाच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला आहे, ज्याची माहिती त्याने स्वतः इन्स्टाग्रामवर दिली आहे. याबरोबर त्यांनी मुलाचे नावही जाहीर केले आहे. ही आनंदाची बातमी समोर येताच या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. २४ ऑगस्ट रोजी, त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि एक हृदयस्पर्शी पोस्ट पोस्ट शेअर करत ही बातमी शेअर केली.

गायक जस्टिन बीबरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पहिल्या मुलाच्या आगमनाची बातमी शेअर केली आहे. फोटो शेअर करताना गायकाने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “वेलकम होम जॅक ब्लूज बीबर”. जस्टिन व हेली बीबर यांनी त्यांच्या लहान मुलाचे नाव देखील चाहत्यांसह शेअर केले आहे, ज्याचा त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये उल्लेख केला आहे. याशिवाय दोघांनीही पोस्टमध्ये बाळाच्या लहान पायांची झलक दाखवली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : कॅप्टन होताच निक्कीच वागणं बदललं, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, जान्हवीचाही घेतला समाचार, म्हणाली, “तू मालकीण नाही…”

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जस्टिन बीबरने हेलीच्या गरोदरपणाची माहिती सोशल मीडियावर दिली होती, त्यानंतर तो सतत चर्चेत राहिला. यावर्षी तो अनंत अंबानी व राधिका मर्चंटच्या लग्नात परफॉर्म करण्यासाठी भारतात आला होता. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये त्याचं कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं. ज्याच्या क्लिप व्हायरल झाल्या आणि त्या क्लिपने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने गायन विश्वात प्रवेश केला आणि आपल्या आवाजाने सर्वांवर जादू केली तेव्हापासून प्रत्येकजण त्याचा वेडा आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “ती माझ्या पायाखाली”, इरिनावरुन झालेल्या भांडणात वैभवचा राग अनावर, टीम A मध्ये ताटातूट?

या छोट्या पाहुण्याच्या घरी आल्याच्या आनंदाची बातमी ऐकून सर्वजण गायकाचे अभिनंदन करत आहेत. फोटोग्राफर डब्बू रत्नानी, अभिनेत्री स्मृती खन्ना यांनी अभिनंदन केले आहे. एकदा ‘द एलेन शो’मध्ये जस्टिन म्हणाला होता, “हेलीला हवी तितकी मुलं मला मान्य आहेत. मी माझा स्वतःचा ग्रुप तयार करेन. मला असे वाटते की शरीर तिचे आहे आणि ती तिला पाहिजे ते करु शकते”. त्याचवेळी, हेलीने ‘संडे टाइम्स’शी बोलताना सांगितले होते की, तिला मुलाला जन्म देण्याची भीती आहे.

Tags: justin bieber and hailey bieberJustin Bieber Blesssed With Baby Boyjustine bieber
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Bigg boss Marathi 5 daily updates Abhijeet Sawant sung a special song Lafjo Mein on the occasion of Nikki Tamboli birthday

Bigg Boss Marathi : बाई‌‌ऽऽऽऽऽ...; अभिजीतने निक्कीच्या वाढदिवसानिमित्त गायलं 'हे' खास गाणं, दोघांच्या मैत्रीची जोरदार चर्चा, शुद्ध मैत्री की Strategy?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.