Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, गणीचा अपमान करुन दिशा तिच्या रूममध्ये बसलेली असते. तेव्हा प्रीतम दिशाला जाब विचारायला म्हणून येतो तेव्हा तो सांगतो की, त्या निरागस गणीने तुझं असं काय बिघडवलं आहे आणि तू पारू आणि त्या गणीच्या मागे हात धुवून लागलेली असते. तुझ्याकडे अशी काय कमी आहे की तू त्यांच्या हात धुवून मागे लागते. यावर दिशा सांगते, आज मी तुला सगळं काही खरं सांगते ती पारू माझ्या होणाऱ्या नवऱ्याची वकिली करते ते मला अजिबात आवडत नाही. माझा होणारा नवरा त्या पारूभोवती फिरत असतो हे मला अजिबात आवडत नाही.
यावर प्रीतम सांगतो की, ती माझी मैत्रीण आहे. त्यानंतर दिशा प्रीतमला त्याची लायकी दाखवते तेव्हा प्रीतम सांगतो की, आई आणि दादाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे एक दिवस तुला मी सगळ्यांसमोर उघडकीस आणेल आणि हा दिवस काही दूर नाहीये असं म्हटल्यावर दिशाच्या तळपायाची आग मस्तकात जाते. त्यानंतर तिथून प्रीतम निघून गेल्यावर दिशा म्हणते आता प्रीतमला धडा शिकवायलाच हवा असं म्हणत ती नवीन एक प्लान आखते. तर गुरुजी इकडे मुहूर्त काढायला आलेले असतात तेव्हा ते गणपती नंतरच्या तिसऱ्या आठवड्यातील रविवारचा मुहूर्त सांगतात. हा मुहूर्त थोडासा दूर असल्याने दिशाची आई घाई करत असते. मात्र अहिल्यादेवी सांगते की, हा मुहूर्त योग्य आहे तर आपण याच मुहूर्ताला लग्न करुया. त्यानंतर पारू तोंड गोड करायला सर्वांना गोड घेऊन येते. तर प्रिया पारूला सांगते की, बाहेर काय सुरु आहे ते पाहतेस ना, हे सगळं काही थांबवावच लागेल नाहीतर प्रीतम सर कधी सुखी होणार नाही.
अहिल्यादेवी समोर हे सत्य आणावच लागेल. अहिल्यादेवींना का कळत नाहीये की दिशाचं वागणं खोटं आहे. यावर पारुला राग येतो, तुम्ही अहिल्यादेवींना काही बोलू नका असं ती प्रियाला सांगते. मात्र पारूला प्रियाचं म्हणणं मनोमनी बरोबर असल्याचं वाटत असतं. तर इकडे दिशा सगळ्यांसमोर प्रीतमचा कौतुक करते आणि सांगते की, आता तुझी ऑफिसमध्ये मीटिंग आहे त्यामुळे तू तातडीने तिकडे जा. तर यावर प्रीतम सांगतो की, मी दादा बरोबर जातो तेव्हा दिशा त्याला सांगते की, तू एकट्याने जा. हा तुझा प्रोजेक्ट आहे. क्लाइंट तुझी तिकडे वाट बघत आहेत. हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप बरं वाटतं की प्रीतम एक प्रोजेक्ट हँडल करतोय. त्यानंतर प्रीतम आदित्यच्या रूममध्ये येतो आणि सांगतो की, मी तुझ्याकडे एक मागु का?, मला दिशा बरोबर लग्न करायचं नाही.
आणखी वाचा – लग्नाच्या तीन वर्षांनंतर अंकिता लोखंडे गरोदर?, जवळच्या व्यक्तीकडून माहिती, गुडन्यूज कधी सांगणार?
मी तिच्याबरोबर लग्न करुन सुखी होऊ शकत नाही. तुम्हाला का कळत नाहीये या गोष्टी, हे सगळं काही बोलून जातो. मात्र आदित्य प्रीतमला दम भरवतो आणि ऑफिसमध्ये जायला सांगतो. तर इकडे पारूला चिंता वाटून राहते की, दिशा मॅडमने असं प्रीतम सरांना एकट्याला का जायला सांगितलं. प्रीतम सरांच काही वाईट तर होणार नाही ना ते नेहमीच आदित्य सरांबरोबर जातात. तेव्हा पारू प्रियाला प्रीतम बरोबर जायला सांगते. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळत आहे की, दिशाचा सांगण्यावरुन तिचा मित्र प्रीतमला भरपूर दारू पाजतो आणि दारू पिऊन प्रीतम ऑफिसमध्ये येतो हे पाहून अहिल्या देवींचा राग अनावर होतो आणि त्या प्रीतमच्या सणसणीत कानाखाली लगावतात. आता दिशाचा हा डाव पारू, प्रिया अहिल्या देवींसमोर आणतील का?, हे सारं पाहणं मालिकेत रंजक ठरेल.