Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नेहमीच काही ना काही वाद, भांडण होताना दिसतात. कोणाच्या खाण्यावरुन, कोणाच्या बोलण्यावरुन, कोणाच्या वागणुकीवरुन इतर स्पर्धकांना बोल लगावले जातात. दरम्यान काही दिवसांपूर्वीच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात खाण्यावरुन एक वाद झाला होता. हा वाद डीपी व आर्या जाधव यांच्यामध्ये झाला होता. आर्याने जास्त वेळा जेवण घेतल्याने डीपीने तिला जेवणावरुन टोकल होतं. तेव्हा आर्याला खूप राग आला होता. आर्यानं डीपी बरोबर यावेळी भांडण केलं. माझ्या खाण्यावरुन मला बोलायचं नाही असे स्पष्ट शब्दात सांगत तिने डीपीला टोकलं.
आता डीपीनंतर हा वाद पुन्हा एकदा ‘बिग बॉस’च्या घरात पाहायला मिळतोय. मात्र हा वाद डीपी नव्हे तर आर्या व निक्की मध्ये झालेला आहे. त्यामुळे आर्या जेवण सोडून निघून जाताना दिसली. या सर्व प्रकरणामुळे आर्या बरीच खचलेली दिसते. आर्याला अश्रू अनावर झालेलेही पाहायला मिळाले. ‘बिग बॉस’च्या घरात रॅपर म्हणून आलेली आर्या स्वतःला सिद्ध करण्यासाठी लढताना दिसत आहे. निक्की जान्हवी यांना तर ती एकटी भारी पडते. बरेचदा तिचं निक्की- जान्हवी बरोबर वाजलेले पाहायला मिळालं. मात्र आता पुन्हा एकदा आर्या व निक्कीमध्ये जेवणावरुन बाचाबाची झालेली पाहायला मिळाली.
निक्की आर्याला जेवणावरुन टोकताच आर्याला अश्रू अनावर झाले आणि ती तिथून निघून गेली. शेवटी आर्याने या घरात राहायचं नाहीये असं सुद्धा म्हटलं. ‘बिग बॉस’ जवळ तिने विनंती करत मला लवकरात लवकर इथून बाहेर काढा असं म्हटलं आहे. यापूर्वी ‘बिग बॉस’च्या घरातील स्पर्धक योगिता चव्हाण हिने सुद्धा मानसिक त्रास होत असल्याचं सांगत ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडायचं आहे असं सांगितलं. योगितानंतर आता आर्यादेखील ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडण्याची विनंती करताना दिसते. तेव्हा वर्षाताई तिला येऊन घट्ट मिठी मारतात आणि त्यावेळी त्याही भावुक झालेल्या दिसतात.
आर्याच्या या भांडणादरम्यान तिच्या टीममधील मित्रांनी तिच्यासाठी स्टॅन्ड घेतलेला पाहायला मिळाला. अंकिता, पॅडी, धनंजय, सूरज, वर्षा ताई ही सगळीच मंडळी आर्याची बाजू घेत निक्कीला बोलताना दिसले. यानंतर आर्याने अंकिताजवळ मन मोकळं करताना मला इथं राहायचं नाही. प्लिज ‘बिग बॉस’ असं म्हटलं. यावेळी तिने केवळ निक्कीमुळेच नाही तर मला आपल्या ग्रुपमध्येही एकटं वाटत असल्याचं सांगितलं.