सोमवार, एप्रिल 20, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बाळाच्या जन्मानंतर ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, “माझा बाप्पा…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
सप्टेंबर 27, 2023 | 8:34 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Radha Sagar reveals her Baby face

बाळाच्या जन्मानंतर 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम अभिनेत्रीने दाखवली बाळाची पहिली झलक, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, "माझा बाप्पा…"

मराठी मालिकांमध्ये झळकलेली अभिनेत्री राधा सागर हिने आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरलेली आहे. राधाने सध्या मालिकाविश्वातून ब्रेक घेतला आहे. त्याचं कारणही तितकंच विशेष आहे. राधाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून तिच्या बाळाची पहिली झलक नुकतंच तिच्या चाहत्यांना दाखवली आहे. (Radha Sagar reveals her Baby face)

काही महिन्यांपूर्वी राधाने तिच्या वाढदिवशी आई होणार असल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. त्यानंतर गरोदरपणात केलेलं फोटोशूट आणि डोहाळे जेवणाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरलं होता. काही दिवसांपूर्वी तिने एका चिमुकल्याला जन्म दिला असून नुकतंच त्याला एक महिना पूर्ण झालं. त्यानिमित्ताने तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिच्या बाळाची छोटीशी झलक दाखवली आहे.

हे देखील वाचा – खास दागिने, मराठमोळा साज अन्…; अक्षरा व अधिपतीचा लग्नसोहळा ठरणार खास, फोटोंनी वेधलं लक्ष

राधाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत राधा तिच्या बाळाला खेळवत असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर फुलांपासून बनवलेल्या गणपती बाप्पाबरोबर तिचं बाळ दिसत आहे. यावेळी बाळाने सुंदर पेहराव केला होता. मात्र, या व्हिडिओमध्ये तिने बाळाचा चेहरा दाखवलेला नाही. “माझा बाप्पा किती गोड दिसतो..” असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केला.

View this post on Instagram

A post shared by Radha Sagar (@radhasagarofficial)

हे देखील वाचा – ‘तू चाल पुढं’मधील शिल्पीने मुबंईमध्ये खरेदी केलं स्वप्नातलं घर, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “स्वप्न खरी होतात…”

तिचा हा व्हिडिओ चाहत्यांना प्रचंड भावला. नेटकऱ्यांसह अनेक कलाकारांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, १० वर्षांपूर्वी राधाने सागर कुलकर्णीबरोबर लग्न केलं होता. त्यानंतर तिने आई होण्याचा निर्णय घेत काही काळासाठी या क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. आई बनल्यानंतर राधा सध्या तिच्या बाळाबरोबर आनंदाचे क्षण घालवताना दिसत आहे.

Tags: marathi tv actressradha sagarRadha Sagar reveals her Baby face
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
akshara bride wedding look photo

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये लगीनघाई, अक्षराच्या मंगळसूत्राच्या डिझाइनने वेधलं लक्ष, नेमकं काय आहे खास?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.