सर्वसामान्यांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येकजण पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो. प्रत्येकांच्या स्वप्नांची परिभाषा ही निराळी असते, आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतो. सर्वसामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेच स्वप्न पूर्ण करण्याच्या मागे असतात. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं एक स्वप्न पूर्ण झालं आहे. ही मराठमोळी अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगांवकर. धनश्री सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती सोशल मीडियावरून काही ना काही पोस्ट करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.(Dhanashri Kadgaonkar Shared Goodnews)
अशातच या मराठमोळ्या अभिनेत्रीचं एक स्वप्न पूर्ण झालं असल्याची खुशखबर तिने चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. धनश्रीने इन्स्टाग्रामवरून नुकतंच स्वतःच घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी शेअर केली आहे. “नवं घर, स्वप्न खरी होतात” असं कॅप्शन देत धनश्रीने काही फोटो शेअर केले आहेत. यांत पहिल्या फोटोत धनश्री स्वतः घराची किल्ली घेताना दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत, ती व तिचा पती किल्ली घेताना दिसतोय, आणि तिसऱ्या फोटोत धनश्रीचा लेक कबीर घराची किल्ली घेऊन उभा आहे.
धनश्रीने नवं घर घेतलं असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली आहे. धनश्रीने मुंबईत नवं घर घेतलं आहे. तीच स्वतःच आधीच घर हे पुण्यात आहे. चित्रीकरणासाठी धनश्री नेहमीच मुंबई पुणे असा प्रवास करताना दिसते. धनश्रीचा लेक लहान असल्याने ती पुण्यात त्याला भेटायला जात असते. आता मात्र धनश्रीने हा लांबचा प्रवास कमी करण्यासाठी स्वतःच असं मुंबईत घर घेतलं आहे. धनश्रीच्या या नव्या घराच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक चाहत्यांनीही लाईक्स व कमेंटचा वर्षाव केला आहे.
धनश्री अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील रील्स व व्हिडीओमुळे चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या लेकाबरोबर मज्जा मस्ती करतानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असते. सध्या धनश्री ‘तू चाल पुढं’ या मालिकेत शिल्पी हे पात्र साकारताना दिसत आहे.