शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कलाकार आता काय करतात?, कसं सुरु आहे कलाकारांचं आयुष्य?, जाणून घ्या…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 31, 2024 | 7:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
dil dosti duniyadari cast now

'दिल दोस्ती...' मालिकेतील कलाकार सध्या काय करतात?

‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणून ‘दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेचे नाव घेतले जाते.  ९ मार्च २०१५ रोजी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आली होती. माजघरात राहणारे सहाजण हे वेगवेगळ्या गावांमधून आले होते. मुंबईमध्ये प्रत्येकजण काही ना काही उद्देशाने आले होते. मात्र एका घरात राहताना किती धमाल येते? सहा जणांची मैत्री कशी होते? सुखा-दु:खात एकमेकांना किती साथ देतात? हे या मालिकेमध्ये बघायला मिळाले होते. या मालिकेमध्ये अनेक नवे चेहरे बघायला मिळाले होते. सगळ्याच कलाकरांची भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस पडल्या होत्या. मात्र या मालिकेने २० फेब्रुवारी २०१६ साली प्रेक्षकांचा निरोप घेतला. (dil dosti duniyadari cast now)

‘दिल दोस्ती…’ या मालिकमध्ये सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे, अमेय वाघ, पुष्कराज चिरपुटकर, स्वानंदी टिकेकर, सुवेधा देसाई, रसिका वेंगुर्लेकर, ललित प्रभाकर हे कलाकार मुख्य भूमिकांमध्ये दिसून आले होते. मात्र हे कलाकार सध्या काय करतात? हे आपण आता जाणून घेऊया. या मालिकेमध्ये सर्वात लोकप्रिय पात्रांपैकी एक म्हणजे रेश्मा. रेश्माची भूमिका अभिनेत्री सखी गोखलेने साकारली आहे. या मालिकेमध्ये गावाकडची एक साधी, निरागस अशी भूमिका साकारली आहे. सखी सध्या नाटकांमध्ये काम करताना दिसून आली आहे. तसेच तिच्याबरोबर सुव्रतने या मालिकेमध्ये सुजय साठे ही भूमिका साकारली आहे. मालिका संपल्यानंतर सखी व सुव्रत यांच्या डेटिंगच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. त्यानंतर काही वर्षातच सखी व सुव्रत लग्नबंधनात अडकले. सुव्रतच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर त्याने मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये दिसून आला होता. सध्या सखी व सुव्रत यांचे ‘वरवरचे वधुवर’ हे नाटक गाजले होते.

आणखी वाचा – “जगायची इच्छाच नव्हती आणि…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितली शारीरिक अवस्था, “माझ्या आयुष्याचा एक भाग…”

तसेच चॉकलेट बॉय अशी ओळख असलेला अमेय वाघ मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्येही दिसून आला आहे. ‘अनन्या’, ‘मी वसंतराव’, ‘अश्लील उद्योग’, ‘धुरळा’ असे अनेक चित्रपट सुपरहिट झाले आहेत. तसेच या मालिकेतील आशु ही भूमिका पुष्कराज चिरपुटकरने साकारली होती. त्याच्या विनोदी शैलीने सगळ्यांनाच पोट धरुन हसवले आहे. सध्या तो चित्रपटांमध्ये ही काम करताना दिसत आहे. ‘मुसाफिरा’, ‘बापजन्म’, ‘मी वसंतराव’ या चित्रपटांमध्ये दिसून आला होता. या वर्षी तो ‘लाइक आणि सब्स्क्राइब’ या चित्रपटामध्ये दिसून आला होता.

आणखी वाचा – जामनगरमध्ये नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, मात्र शाहरुखने लपवला चेहरा, नेटकरी म्हणाले, “तोंड लपवलं कारण…”

या मालिकेतील मिनलची भूमिका अभिनेत्री स्वानंदी टीकेकरने साकारली होती. स्वानंदी ही सध्या नाटकांमध्ये काम करताना दिसत आहे. ‘एक शून्य तीन’ या नाटकामध्ये दिसून आली होती. तसेच मराठी नाटकांमध्येही दिसून आली होती. तसेच या मालिकेमध्ये पूजा ठोंबरेदेखील मुख्य भूमिकेत दिसून आली होती. पूजाच्या अल्लड भूमिकेला चाहत्यांची खूप पसंती मिळाली होती. नंतर ती ‘चंद्रविलास’, ‘टिकळी’ या मालिकांमध्ये दिसून आली होती.

Tags: castdil dosti duniyadarimarathi serial
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
dipika kakar surgery
Entertainment

१४ तास ऑपरेशन, लिव्हरचाही काही भाग कापला अन्…; दीपिका कक्करची कॅन्सरशी झुंज, आता परिस्थिती अशी की…

जून 7, 2025 | 11:59 am
filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Next Post
01 january 2025 wednesday daily horoscope may the first day of the year 2025 bring happiness, peace and prosperity in your life

01 January Horoscope : 2025 वर्षाचा पहिला दिवस तुमच्या आयुष्यात आणणार सुख, शांती अन् समृद्धी, अधिक जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.