गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतून अनेक दुःखद बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी रेंजुषा मेनन, डॉ. प्रिया, ज्युनिअर बलैया या कलाकारांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनाने भारतीय सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला होता. अशातच आता एका प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या निधनाची बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बंगाली चित्रपट दिग्दर्शक गौतम हलदर यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. गौतम यांनी बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन हिच्याबरोबर त्यांच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दरम्यान, त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सिनेसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला असून अनेक कलाकार व चित्रपटप्रेमींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. (Film Director Gautam Halder passed away)
समोर आलेल्या माहितीनुसार, गौतम यांना त्यांच्या कोलकाता येथील निवासस्थानी छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना जवळच्या इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र उपचारानंतर त्यांचे काळ निधन झाले. दरम्यान, आज त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार असून गौतम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अभिनेत्री विद्या बालन काल रात्री कोलकाता येथे पोहोचली. यावेळी गौतम हलदर यांच्या निधनाने आपण दुखी असल्याचे अभिनेत्री म्हणाली. तसेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही गौतम हलदर यांच्या निधनावर सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे.
हे देखील वाचा – Aarti Solanki : “वडिलांचं पहिलं लग्न झालेलं आईला माहितच नव्हतं अन्…”, आरती सोळंकीचा खासगी आयुष्याबाबत खुलासा, म्हणाली, “धर्मामुळे दोघांना…”
#GautamHalder, the director of Vidya Balan's first film 'Bhalo Theko', passes away. #BhaloTheko #GoutamHalder pic.twitter.com/i2szh4Wbly
— New Delhi Film Foundation (@CinemaNDFF) November 3, 2023
गौतम हलदर यांनी नुकतंच रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘रक्त कराबी’ बरोबर तब्बल ८० नाट्य प्रस्तुतींचे दिग्दर्शन केले आहे. २००३ मध्ये ‘भालो थेको’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले असून या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन मुख्य भूमिकेत होती. त्याचबरोबर २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्गज अभिनेत्री राखी गुलजार यांच्या ‘निर्वाण’ चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. गौतम हलदर त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले होते. गौतम यांच्या निधनावर त्यांचे चाहते, चित्रपटप्रेमी व बंगाली सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहत आहे.