शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘मी जिवंत आहे’ म्हणत २४ तासांनी आली समोर; हनिमूनवर नवऱ्याला तुरुंगात पाठवणारी पूनम पांडे पुन्हा चर्चेत

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 11, 2026 | 3:38 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Poonam Pandey Controversy

पूनम पांडे पुन्हा चर्चेत

Poonam Pandey Controversy : मॉडेलिंगपासून ते सिनेमांपर्यंत आणि सोशल मीडियापासून टीव्हीपर्यंत पूनम पांडे हे नाव कायम चर्चेत असतं. तिची बोल्ड स्टाईल, वेगवेगळी विधानं आणि वादग्रस्त निर्णय यामुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहे. तिचं आयुष्यही एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखंच आहे. काही वर्षांपूर्वी तर पूनम पांडेने सगळ्यांनाच धक्का दिला होता. कारण अचानक तिच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरली आणि काही वेळातच ती देशभर चर्चेचा विषय बनली. अनेकांनी तिच्यावर श्रद्धांजलीही व्यक्त केली. मात्र अवघ्या २४ तासांतच पूनम स्वतः समोर आली आणि आपण जिवंत असल्याचं सांगितलं. सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती करण्यासाठी हा सगळा प्रकार केल्याचं तिने सांगितलं. पण या प्रकारामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली.

पूनमच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक वाद पाहायला मिळाले. लग्नानंतर अवघ्या ११ दिवसांतच तिने तिच्या पतीवर गंभीर आरोप केले. हा वाद इतका वाढला की त्याला काही काळ तुरुंगातही जावं लागलं. या घटनेमुळे त्यांच्या नात्यातील वाद सर्वांसमोर आले आणि त्यानंतर दोघांमध्ये नेहमीच वाद-विवाद होत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. ११ मार्च १९९१ रोजी कानपूरमध्ये पूनम पांडेचा जन्म झाला. एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या पूनमने तिचं शिक्षण दिल्लीत पूर्ण केलं. त्यानंतर अवघ्या १८ व्या वर्षी तिने मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. तिच्या बोल्ड फोटोशूट्समुळे ती लवकरच चर्चेत आली. तसेच २०१२ च्या ‘किंगफिशर कॅलेंडर’मध्ये झळकण्याची संधीही तिला मिळाली होती.

आणखी वाचा – महानगर गॅसच्या नावे फ्रॉड कॉल आला आणि…; सिद्धार्थ चांदेकरने केलं असं काही की हसूच थांबेना, मराठी गाणं म्हणायला लावलं आणि…

२०११ मध्ये तिने केलेल्या एका घोषणेमुळे ती अचानक चर्चेत आली. भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला तर आपण नग्न अवस्थेत मैदानभर फिरू, असं तिने म्हटलं होतं. जरी तसं प्रत्यक्षात घडलं नाही, तरी तिच्या त्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर २०१३ मध्ये ‘नशा’ या सिनेमातून पूनमने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली होती आणि त्यात काही बोल्ड सीनही होते. या सिनेमाच्या पोस्टरवरूनही मोठा वाद झाला होता आणि काही ठिकाणी त्या पोस्टर्सना आग लावण्यात आली होती. सिनेमा, टीव्ही आणि सोशल मीडिया अशा सगळ्याच माध्यमांमध्ये पूनम पांडेने आपली वेगळी ओळख निर्माण केली. ‘खतरों के खिलाडी ४’ आणि ‘लॉक अप’सारख्या रिअ‍ॅलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. बोल्ड प्रतिमा, वाद आणि चर्चांमुळे पूनम पांडे आजही कायम लोकांच्या चर्चेत असलेलं नाव आहे.

आणखी वाचा – “गेली दोन वर्षे चांगली गेली नाहीत”, गोविंदा-सुनीता आहुजाच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अखेर लेकीनेच सोडलं मौन, म्हणाली…

Tags: bollywood newsentertainment newsPoonam Pandey Controversy
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Mahakumbh Mela viral girl

महाकुंभच्या मोनालिसाने मुस्लिम प्रियकराशी केले लग्न, फोटो समोर येताच बसला धक्का, फोटो समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.