Mahakumbh Mela viral girl : 2025 च्या महाकुंभमेळ्यातून व्हायरल झालेल्या मोनालिसाने लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे आणि त्यावरून गदारोळ झाला आहे. खरंतर मोनालिसाने बॉयफ्रेंड फरमान खानसोबत लग्न केलं आहे, ज्याचा व्हिडीओही समोर आला आहे. मोनालिसाने कुटुंबाच्या विरोधात फरमान खानशी लग्न केले असून कुटुंबीय तिच्यावर दबाव आणत असल्याचा आरोप केला आहे. तो तिला धमक्याही देत होता, त्यामुळे तिला घर सोडावे लागले. मोनालिसाने फरमान खानसोबत कोर्ट मॅरेज केले आणि त्यानंतर तिरुअनंतपुरममधील अरुमनूर नैनार मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार सात फेरे घेतले. यांत आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये पती फरमान मोनालिसाच्या गळ्यात मंगळसूत्र घालताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दोघेही कोर्टात उभे आहेत. कोर्ट मॅरेजनंतर त्यांनी लग्नाचा दाखलाही हातात धरला आहे.
मोनालिसा दीड वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती, जेव्हा घरच्यांनी तिच्यावर दबाव आणला तेव्हा तिने घर सोडले. ‘आज तक’च्या रिपोर्टनुसार, मोनालिसा आणि फरमान खान जवळपास दीड वर्ष रिलेशनशिपमध्ये होते, मात्र मोनालिसाच्या कुटुंबीयांना हे नाते मान्य नव्हते. विशेषत: वडील या नात्याच्या विरोधात होते आणि कुटुंबाकडून मोनालिसावर खूप दबाव आणला जात होता. त्यामुळेच ती लग्नासाठी केरळमध्ये पोहोचली आणि पोलिस संरक्षणाची मागणी केल्याचे मोनालिसाने सांगितले. लग्नापूर्वी, मोनालिसा आणि फरमान बुधवारी, 11 मार्च रोजी तिरुअनंतपुरममधील थाम्पनूर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले होते. तिथे मोनालिसाने पोलिस संरक्षण मागितले आणि सांगितले की तिचे वडील तिला जबरदस्तीने घरी नेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आणखी वाचा – ‘मी जिवंत आहे’ म्हणत २४ तासांनी आली समोर; हनिमूनवर नवऱ्याला तुरुंगात पाठवणारी पूनम पांडे पुन्हा चर्चेत
कुंभ मेले से फेमस हुई मोनालिसा भोसले ने बॉयफ्रेंड “फरमान खान ” से तिरुवनंतपुरम के एक मंदिर में शादी की ….
मोनालिसा के परिवार के विरोध के चलते कपल ने केरल पुलिस से सुरक्षा मांगी है.…. pic.twitter.com/7r6katXhDC— Singh’am (@Amar365x) March 11, 2026
त्याचवेळी, ‘दैनिक भास्कर’नुसार, पोलिसांनी सांगितले की, मोनालिसा ही प्रौढ आहे आणि तिच्या इच्छेनुसार लग्न करू शकते. मोनालिसाने सांगितले की, ती आणि फरमान खान केरळमध्ये ‘द डायरी ऑफ मणिपूर’ चित्रपटाचे शूटिंग करत होते आणि त्यादरम्यान ते एकमेकांना भेटले. फरमानने सांगितले की, यापूर्वी मोनालिसाने त्याला प्रपोज केले होते, पण त्याने नकार दिला होता. मात्र, नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. मोनालिसाच्या अचानक लग्नामुळे सगळेच हैराण झाले आहेत. यामुळे त्यांचे कुटुंबीयही दुखावले गेले आहे. दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनाही धक्का बसला आहे, ज्यांनी मोनालिसाला ‘द मणिपूर डायरी’मधून चित्रपटांमध्ये लॉन्च केले.
दिग्दर्शकाने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांबलचक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये त्याने दावा केला आहे की मोनालिसा लव्ह जिहादची शिकार झाली आहे. मोनालिसाने प्रेमातून नव्हे तर मोहातून लग्नाचे पाऊल उचलले होते आणि मॅनेजरने तिला दक्षिण भारतात विकले होते, असा दावाही सनोजने केला आहे.





