Poonam Pandey Viral Video : अभिनेत्री पूनम पांडे हिचे व्हिडीओ नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. बरेचदा ती काही ना काही शेअर करत, वा पापराजींबरोबर स्पॉट होताना दिसते. अशातच अभिनेत्री सध्या एका व्हिडीओमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी ती स्वतः चर्चेत येण्याचे कारण नाही आहे. कारण समोर आलेल्या व्हिडीओमधून एखादी अनोळखी व्यक्ती तिच्याबरोबर रस्त्यावर खराब कृत्य करताना दिसली, आणि म्हणून पूनम पांडे चर्चेत आली. खरं तर, पूनम पांडे पापराजींना पोज देत त्यांच्याशी संवाद साधत असताना हा विचित्र प्रकार घडला. भर रस्त्यावर हा प्रकार घडल्याने अभिनेत्री थोडीशी घाबरलेली दिसली. यावेळी पापराजींनी हा अनर्थ घडण्यासपासून टाळले. ज्यामुळे अभिनेत्री सुखरुप दिसली.
पूनम पांडे पापराजींना पोज देत असताना अचानक एक व्यक्ती तिच्याकडे येते आणि सेल्फी घेण्याच्या सबबावर तिच्याबरोबर एक विचित्र कृत्य करते, ज्यामुळे पूनम पांडे घाबरली. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये सेल्फी घेण्यास आलेला इसम अभिनेत्रीच्या जवळ जात तिला किस करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
आणखी वाचा – “परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका”, अनुष्काला पारूने धमकावलं, धडा शिकवायला कोणता डाव आखणार?
या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, ती लाल रंगाच्या गाऊन आणि डेनिम जॅकेटमध्ये पापाराजीला पोज देताना दिसत आहे. यावेळी ती त्यांच्याशी संवाद साधतानाही दिसत होती. त्यानंतर एका अज्ञात इसमाकडून चुकीचं कृत्य होत असल्याचे कळताच पापाराजी त्याला लांब ढकलतात आणि त्याचा फोन काढून घेतात. या कृतीमुळे पूनम प्रचंड घाबरलेली दिसली. यानंतर, तेथे उपस्थित लोक देखील त्या व्यक्तीला असे करण्यामागचा जाब विचारताना दिसत आहेत. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, नेटकरी यावर टिपण्या देत आहेत.
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी राग व्यक्त केला आहे. तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत म्हटलं की, “हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे आणि जनतेला फसवण्याचा प्रयत्न केला गेला आहे”. तर एका वापरकर्त्याने लिहिले आहे की, “व्हिडीओमध्ये पाहिलेली व्यक्ती बी ग्रेड चित्रपटांचा अभिनेता आहे”. आता सत्य काय आहे, ते अद्याप समोर आलेलं नाही वा पूनम पांडेनेही यावर काहीही भाष्य केलेलं नाही.