Paaru Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन पाठिंबा देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. दिशा आणि अनुष्काच्या एन्ट्रीने मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे, तर पारूने दोघींचा डाव ओळखला असून ती वेळोवेळी त्यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, दिशा व अनुष्का या पारूला वरचढ ठरत आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जात आता पारू अनुष्काचा डाव सगळ्यांसमोर आणणार असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारू अनुष्काला ताकीद देताना पाहायला मिळणार आहे. दिशाच्या मदतीने अनुष्काने किर्लोस्करांच्या नायनाट करण्याचं ठरवलं आहे.
तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर दिशा किर्लोस्कर कुटुंबाचा सर्वनाश करण्यासाठी आली आहे. शिवाय अनुष्का दिशाच्या अपमानाचा बदला घ्यायला किर्लोकारांच्या घरात शिरली आहे. याची सुरुवात दोघीही पारूला संपवून करताना दिसणार आहेत. मात्र पारू वेळोवेळी अनुष्का आणि दिशा यांचा डाव पलटवताना दिसत आहे. “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तुमच्या आणि किर्लोस्कर कुटुंबामधील भिंत बननू उभी राहिन”, अशी सक्त ताकीद पारूने दिली होती.
अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अनुष्का पारूला धमकावताना दिसत आहे. अनुष्का पारूला म्हणतेय की, “जा तुझ्या देवी आईला दिशा आणि माझं सत्य जाऊन सांग आणि त्यानंतर माहितीये ना तुला”. यावेळी अनुष्का पारूच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यामुळे पारूचा राग अनावर होतो. पारू अनुष्काचा हात चांगलाच पिरगळवते आणि म्हणते, “माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. अनुष्का मॅडम एक लक्षात ठेवा, या परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही डाव जिंकलात आणि खेळीपण तुम्हीच केलात. आता बारी आहे पारूची”.
पारूची ही धमकी ऐकून अनुष्काच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. पारू मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला पसंती दर्शविली आहे. पारूचा घाबरटपणा अनेकांना खटकत होता आता मात्र पारूच धीटाने बोलणं अनेकांच्या पसंतीस पडलं आहे. “कधीतरी हिरोईन असल्यासारखी वागली बाबा”, “आली पारू तिच्या रूपात”, “पारू द डॉन”, अशा कमेंट करत मालिकेच्या प्रोमोला पसंती दर्शविली आहे.