बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल अभिनेत्री पूनम पांडे हिच्या अचानक आलेल्या निधनाच्या बातमीने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्रीकहा गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरने मृत्यू झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे तिच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या ३२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. आज तिच्या निधनाने पुन्हा एकदा लोकांमध्ये पूनमबद्दल जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली आहे. पूनमकडे किती मालमत्ता आहे आणि तिच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत काय होता? याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला आहे.
पूनमने अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याबरोबरच अनेक रिॲलिटी शो व मॉडेलिंगच्या क्षेत्रातही खूप नाव कमावले होते. तिच्या उत्पन्नाचा स्रोत हा चित्रपट, टीव्हीसह मॉडलिंग क्षेत्रही होते. याशिवाय पूनमने काही मासिकांसाठी फोटोशूट करूनही खूप कमाई केली. ती आलिशान कारचीही शौकीन होती. याशिवाय पूनमने तयार केलेल्या स्वत:च्या ॲपमधूनही भरपूर कमाई केली. तर जाणून घेऊयात पूनमच्या एकूण संपत्तीबद्दल…
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, पूनम पांडेची संपत्ती ५२ कोटी रुपये इतकी आहे. पूनमने चित्रपटांमधूनही चांगली कमाई केली आहे. ‘नशा’, ‘लव की पॅशन’, ‘मालिनी अँड कंपनी’, ‘आ गया हीरो’ आणि ‘द जर्नी ऑफ कर्मा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत तिने अनेक रुपये कमावले. याशिवाय, तिने ‘टोटल नादनिया’ व ‘प्यार मोहब्बत shshsh’ या टेलिव्हिजन शोमध्येदेखील काम केले होते. त्यामुळे या शोमधूनही तिला चांगले पैसे मिळाले.
आणखी वाचा – “तरुण स्त्रीचा…”, पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला मोठा धक्का, फोटो पोस्ट करत म्हणाली, “तिचा बळी जाणं…”
याशिवाय पूनमने देशातील सर्वात प्रसिद्ध रिॲलिटी शो ‘बिग बॉस’मध्येही सहभाग घेतला होता आणि या शोमधून तिला चांगली रक्कम मिळाली होती. तिने भोजपुरी चित्रपट ‘अदालत’ व अल्ट बालाजीच्या ‘लॉकअप’ या शोमध्येही काम केले होते. यामुळे पूनमला दर आठवड्याला सुमारे ३ लाख रुपये मानधन मिळत होते. पूनमचे स्वतःचे ॲपही आहे, ज्याचे सुमारे ३२ लाख सशुल्क सदस्य आहेत. या अॅपद्वारे तिची सर्वाधिक कमाई होत असल्याचे म्हटले जाते.