शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

एक वर्ष रुग्णालयात, मारहाण अन्…; लग्नाच्या १० दिवसांनंतर पूनम पांडेने नवऱ्यावर केले होते गंभीर आरोप, रिलेशन होतं पण…

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 2, 2024 | 2:09 pm
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Poonam Pandey had filed a case against her ex husband sam bombay for alleging domestic abuse see the details

एक वर्ष रुग्णालयात, मारहाण अन्...; लग्नाच्या १० दिवसांनंतर पूनम पांडेने नवऱ्यावर केले होते गंभीर आरोप, रिलेशन होतं पण...

Poonam Pandey Died at 32 : बॉलिवूड अभिनेत्री व मॉडेल पूनम पांडेच्या निधनाची बातमी सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली. तिच्या निधनानंतर चाहते सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त करत आहेत. वयाच्या ३२व्या वर्षी पूनमने जगाचा निरोप घेतला. कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी तिने लढा दिला. मात्र यापूर्वी तिने कधीच तिच्या आजाराबाबत खुलेपणाने भाष्य केलं नाही. तसेच पूनमने तिच्या आजाराचं गुपितच ठेवलं. अचानक पूनमच्या निधनाची बातमी ऐकताच चाहत्यांसह कलाविश्वाला मोठा आश्चर्याचा धक्का बसला आहे. शिवाय तिचं खासगी आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं. लग्नानंतर पतीसह तिचा वाद निर्माण झाला.

पूनम तिच्या बोल्ड लूकमुळे सतत चर्चेत राहिली. पण त्याचबरोबरीने तिचं वैवाहिक आयुष्य अधिका वादग्रस्त ठरलं. १ सप्टेंबर २०२०मध्ये तिने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेबरोबर लग्नगाठ बांधली. करोनाकाळात तिने बॉयफ्रेंडसह गुपचूप लग्न उरकलं. मुंबईमधील राहत्या घरी अगदी जवळचे नातेवाईक व मित्र-मंडळींमध्ये तिने लग्न केलं. पण तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. तिने नवऱ्यावर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली.

View this post on Instagram

A post shared by Poonam Pandey (@poonampandeyreal)

आणखी वाचा – Poonam Pandey Death : “तरुण स्त्रीचा…”, पूनम पांडेच्या निधनानंतर कंगना रणौतला मोठा धक्का, फोटो पोस्ट करत म्हणाली, “तिचा बळी जाणं…”

लग्नाच्या १० दिवसांनंतर तिने सॅमविरोधात तक्रार दाखल केली. पतीवर तिने मारहाणीसारखे गंभीर आरोप केले. त्यानंतर २३ सप्टेंबरला सॅमला गोव्यामधून अटक करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार साऊथ गोव्यामधील कॅनाकोवा गावामध्ये घडली. त्यादरम्यान गोव्यामध्ये पूनम एका चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. पूनमने ‘लॉकअप’ शोमध्ये तिच्याबरोबर घडलेल्या सगळ्या घटनांबाबत भाष्य केलं होतं.

आणखी वाचा – Poonam Pandey Death : धक्कादायक! पूनम पांडेचं निधन, कर्करोगाशी सुरु असलेली झुंज ठरली अपयशी, ३२व्या वर्षी जगाचा निरोप

सॅम दारु पिऊन मारतो तसेच डोक्यावरही मारहाण करतो असं पूनमने म्हटलं होतं. त्यामुळे ब्रेन हॅमरेज हा आजार झाला असल्याचंही तिने यावेळी सांगितलं. जवळपास एक वर्ष रुग्णालयामध्ये पूनम भरती होती. तिच्यावर अधिक काळ उपचार सुरु होते. पूनमच्या हातावर, चेहऱ्यावर तसेच डोक्यावर जखमा झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी सॅमला अटक केल्यानंतर त्याला जामिनावर सोडवण्यातही आलं होतं. तुरुंगामधून बाहेर आल्यानंतर पूनम पुन्हा सॅमबरोबर एकत्र राहू लागली. यादरम्यान पूनमला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं.

Tags: Cervical CancerLock Upppoonam pandeyPoonam Pandey Breaking News in MarathiPoonam Pandey ControversyPoonam pandey deathPoonam pandey death news. Poonam pandeyPoonam Pandey Death ReasonPoonam Pandey DiedPoonam pandey dies at 32Poonam Pandey InstagramPoonam Pandey MoviesPoonam Pandey Passes AwayPoonam Pandey suffered Cervical CancerPoonam Pandey Videossam BombayWhat Is Cervical Cancer
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Anushka sharma troll after banglore stampede
Entertainment

“खोटं रडू नकोस, इतके पैसे कमावले पण…”, बंगळूर चेंगराचेंगरीवर पोस्ट करताच अनुष्का शर्मा ट्रोल, नेटकऱ्यांचा संताप

जून 6, 2025 | 2:30 pm
 Celebs Live In Rented Houses
Entertainment

कोट्यवधी कमावतात तरीही कलाकार भाड्याच्या घरात का राहतात?, कारण ऐकून व्हाल थक्क, जाणून घ्या…

जून 6, 2025 | 1:30 pm
Next Post
Poonam pandey net worth income and her property see the details

वयाच्या ३२व्या वर्षी इतकी संपत्ती मागे ठेऊन गेली पूनम पांडे, एका शोसाठी तब्बल इतके रुपये अन्…; कसं जगत होती आयुष्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.