सोमवार, जून 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज, ‘सालबर्डी’ चित्रपटात महत्वाची भूमिका, उत्सुकता वाढली

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 4, 2026 | 5:19 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Salbardi Movie Pooja Sawant

पोलिसांच्या वर्दीत पूजा सावंतचा जबरदस्त अंदाज

Salbardi Movie Pooja Sawant : मराठी चित्रपटसृष्टीत आघाडीच्या नायिकेला पोलिसांच्या वर्दीत पाहणं हे तसं दुर्मिळच. मात्र आगामी ‘सालबर्डी’ चित्रपटात ही चौकट मोडत पूजा सावंत एका करारी, निर्भीड आणि तडफदार पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. पी.आय.मनोरमा प्रधान असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. नुकताच ‘सालबर्डी’ या चित्रपटाचा दमदार टिझर आणि कलाकारांचे प्रभावी पोस्टर दिमाखात प्रदर्शित करण्यात आले असून, त्याने प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची वाढवली आहे.

या सोहळ्यात पूजाने डॅशिंग एंट्री घेत आपल्या भूमिकेची झलक दाखवली. पोलिस अधिकाऱ्याच्या व्यक्तिरेखेसाठी तिने विशेष मेहनत घेतली असून, पोलिसांची देहबोली,अधिकारपूर्ण संवादशैली आणि शिस्तबद्ध वर्तन यांचा सखोल अभ्यास करत ही भूमिका पूजाने साकारली आहे. वास्तवदर्शीपणा जपण्यासाठी तिने प्रत्यक्ष पोलिस अधिकाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कामकाजाचे बारकाईने निरीक्षण केले. (Salbardi Movie Pooja Sawant)

आणखी वाचा: सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देतेय कर्करोगाशी लढा, आजारपणाबाबत केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या आई-वडिलांना…”

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना पूजा सांगते, ‘वर्दी अंगावर चढताच एक वेगळाच रुबाब आपोआप येतो. तो वेगळा दाखवावा लागत नाही. वर्दीतच एक ताकद असते. माझी ही भूमिका प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देणारी ठरेल.’ चित्रपटातील थरारक स्टंट्स आणि दमदार अ‍ॅक्शन सीन्स हे ‘सालबर्डी’ चे खास आकर्षण असणार आहेत. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील दुर्गम भागात वसलेल्या ‘सालबर्डी’ गावात घडणाऱ्या रहस्यमय, भयावह आणि अस्वस्थ करणाऱ्या घटनांचा थरारक शोध घेणारा हा चित्रपट नेब्यूला फिल्म्सच्या बॅनरखाली साकारण्यात आला आहे. या चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ. गजानन जाधव आणि राम जाधव यांनी केली असून, दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी यांनी सांभाळली आहे. (Salbardi Movie Pooja Sawant)

View this post on Instagram

A post shared by Itsmajja Marathi (@itsmajja.marathi)

चित्रपटाचे छायांकन व संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा व संवाद रोहित शुक्रे यांचे असून, गुरु ठाकूर आणि मुकुंद भालेराव यांच्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली आणि आनंदी जोशी यांच्या आवाजाने चित्रपटातील गाणी सजली आहेत. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर आणि आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दीपक कुदळे पाटील असून, वेशभूषा प्रणिता चिंदगे, रंगभूषा श्रीनिवास मेनूगे आणि कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे. (Salbardi Movie Pooja Sawant)

आणखी वाचा: “भारताने माझा विश्वासघात केला”, इराणमधून आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला सोडायचाय देश, म्हणाली, “इथे सुरक्षित नाही”

Tags: pooja sawantSalbardi Movie Pooja SawantSalbardi Trailer
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

 India Women vs Pakistan Women
Women

भारतीय वाघिणींचा विजय! पाकिस्तानचा ६४ धावांनी उडवला धुव्वा, वर्ल्ड कपमध्ये पहिला विजय

जून 15, 2026 | 11:40 am
urmila matondkar ex husband nikaah
Entertainment

उर्मिला मातोंडकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीने थाटला नवा संसार; घटस्फोटाच्या दोन वर्षांनी केलं लग्न, फोटो समोर

जून 15, 2026 | 11:00 am
Kap Bashi Trailer
Entertainment

नवरा नाहीतर जुळणार का सासू-सूनेची पत्रिका?, ‘कप बशी’ चित्रपटाच्या ट्रेलरने वाढविली उत्सुकता

जून 15, 2026 | 9:57 am
krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Next Post
Rashmika Mandanna Red Saree

लाल रेशमी साडी, पांढरा रेशमी कुर्ता आणि…; हैदराबाद रिसेप्शनमधील रश्मिका-विजयच्या लूकने वेधलं लक्ष, साऊथ इंडियन लूकमध्ये दिसले

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.