शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भारताने माझा विश्वासघात केला”, इराणमधून आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला सोडायचाय देश, म्हणाली, “इथे सुरक्षित नाही”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2026 | 10:51 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mandana Karimi on leaving India

"भारताने माझा विश्वासघात केला", इराणमधून आलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीला सोडायचाय देश, म्हणाली, "इथे सुरक्षित नाही"

Mandana Karimi on leaving India : सध्या मध्यपूर्वेतील देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांची हत्या झाली, त्यावर अभिनेत्री मंदाना करीमी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला. पण आता मंदानाने असे काही बोलून दाखवले आहे ज्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. मंदाना करीमीने अलीकडेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान भारत सोडण्याबाबत भाष्य केले आहे आणि तिच्या घरी इराणला परतण्याची इच्छा व्यक्त केली.

मंदाना करीमी यांचे वादग्रस्त विधान
‘भाग जॉनी’ चित्रपट फेम अभिनेत्री मंदाना करीमीने अलीकडेच ‘बॉलिवूड हंगामा’ला मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी इराण आणि भारताबाबत खुलेपणाने भाष्य केले आहे. मंदाना म्हणाली, “सुरक्षेच्या कारणास्तव मी भारत सोडत आहे. माझ्यासाठी हे खूप अवघड आहे, मी खूप लहान वयात इथे आले आणि आता इथून निघण्याचा विचार करत आहे. भारताने माझा विश्वासघात केला असून गेल्या दोन महिन्यांपासून मला खूप एकटे वाटत आहे. याचे कारण मी इराणबद्दल उघडपणे बोलले. यामुळे मी माझे अनेक मित्र गमावले, त्यांनी स्वतःला माझ्यापासून दूर केले”.

आणखी वाचा – मालिकाविश्वातील अभिनेत्रीला मातृशोक, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती, भावुक होत म्हणाली, “दोघेही असेच गेले…”

View this post on Instagram

A post shared by RK (@rohitkhilnani)

ती पुढे म्हणाली, “या देशाने मला अभिनय आणि मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात अनेक संधी दिल्या आहेत, ज्यासाठी मी सदैव ऋणी राहीन. खामेनी यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये दुसऱ्याला सत्तेवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वतंत्र इराणचे स्वप्न मी खूप दिवसांपासून पाहत होते. जिथे महिलांना पूर्ण स्वातंत्र्य मिळेल, तिथे त्या कॉलेजमध्ये शिकू शकतात आणि हवे ते कपडे घालू शकतात. शक्य तितक्या लवकर मी इराणला परत जाईन. मी माझ्या बॅगा भरल्या आहेत आणि सर्व तयारी पूर्ण झाली आहे”. इतकेच नाही तर मंदाना यांनी खमेनी यांच्या इराणच्या राजवटीला कर्करोग असे संबोधले आहे.

Tags: iran istrail america warmandana karimiMandana Karimi Leaves India
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
ayesha khan rape attempt

बलात्काराची शिकार, लैंगिक संबंध आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, "स्पॉट बॉयने…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.