सोमवार, जून 8, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देतेय कर्करोगाशी लढा, आजारपणाबाबत केली पोस्ट, म्हणाली, “माझ्या आई-वडिलांना…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 4, 2026 | 1:30 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Rajshri Deshpande Breast Cancer

सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री देतेय कर्करोगाशी लढा, आजारपणाबाबत केली पोस्ट, म्हणाली, "माझ्या आई-वडिलांना..."

Rajshri Deshpande Breast Cancer : मराठी सिनेविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्रीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने स्वतःच सोशल मीडियावर पोस्ट करत कॅन्सर झाल्याचे सांगितले आहे. ‘ब्लॅक वॉरंट’, ‘सिक्रेड गेम्स’ मधील दमदार भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री राजश्री देशपांडे कर्करोगाशी सामना करत आहे. राजश्रीला ग्रेड १ च्या स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राजश्रीने इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने कॅन्सरवरील शस्त्रक्रिया आणि उपचाराबाबत माहिती दिली आहे. थेट हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत तिने कॅन्सर आजाराची माहिती दिली.

राजश्रीने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत त्याखाली कॅप्शन देत असं म्हटलं की, “सुदैवाने, नियमित तपासणीदरम्यान हा आजार सुरुवातीच्या टप्प्यातच लक्षात आला, त्यामुळे मला लढण्याची संधी मिळाली. निदनानंतर अनेक चाचण्या आणि शस्त्रक्रियांचा प्रवास एखाद्या रोलरकोस्टर राईडसारखा होता. पण तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे मी यातून बाहेर पडू शकले. शस्त्रक्रियेनंतर माझ्या आई आणि बाबांचे चेहरे पाहून माझ्या मनातली भीती नाहीशी झाली आणि मला ताकद मिळाली. सर्वांच्या पाठिंब्यामुळे आता मी पुन्हा एकदा जग जिंकायला तयार आहे”.

आणखी वाचा – “तिथली परिस्थिती गंभीर…”, विशाखा सुभेदार यांच्या व्हिडीओवर एकनाथ शिंदेची प्रतिकिया, म्हणाले, “त्याला भारतात आणण्याची व्यवस्था…”

View this post on Instagram

A post shared by Rajshri (@rajshri_deshpande)

पुढे तिने म्हटलं, “आता मी खूप चांगल्या प्रकारे रिकव्हर होत आहे आणि लवकरच हॉस्पिटलमधून घरी जाणार आहे. तुमचे प्रेम हेच माझे सर्वात मोठे औषध आहे”, असं म्हणत राजश्री देशपांडेने कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांचे आभार मानले. ही पोस्ट शेअर करत राजश्रीने असंही म्हटलं की, “हे वाचत आहात याचा अर्थ असा की, मला माझ्या आई-वडिलांना हे सांगण्याचं धाडस मिळालंय की मला ‘इनफिल्ट्रेटिंग डक्टल कार्सिनोमा’ म्हणजेच ग्रेड १ ब्रेस्ट कॅन्सरचे निदान झाले आहे”.

Tags: breast cancermarathi actressRajshri Deshpande
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
Next Post
Tighee Marathi Movie

स्वतंत्र, सक्षम स्त्रीचा संदेश देत ‘तिघी’ टीमची कॅन्सर प्रतिबंध मोहिमेत भागीदारी, चित्रपटात आई-मुलीच्या नात्याचा प्रवास उलगडणार

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.