संपूर्ण देशात आज धुळवडीचा सण अगदी उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. आजच्या धुळवडीनिमित्त सर्वत्र आनंदाचं व उत्साहाचं वातावरण आहे. धुळवडीनिमित्त आज सर्वत्र अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या धुळवडीनिमित्त खास गाण्यांवर ठेका धरत सर्वचजण धूळवड साजरी करत आहेत.
अशातच ज्या जोडप्यांचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे, त्यांच्यासाठी तर ही पहिली होळी खूपच खास असते आणि मराठी मनोरंजन विश्वात अशा अनेक जोड्या आहेत, ज्यांच्यासाठी यंदाची धूळवड ही खूपच खास आहे. अशा अनेक जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री पूजा सावंत व पती सिद्धेश चव्हाण.

पूजाचा विवाहसोहळा गेल्या महिन्यात २८ फेब्रुवारीला थाटामाटात पार पडला. लग्नानंतर तिचा हा पहिला होळी सण आहे. पूजाने होळीच्या सणानिमित्त खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्रीची लग्नानंतरची ही पहिली होळी आहे. हा सण पूजा आपल्या पतीबरोबर साजरा करत आहे.

पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कै खास फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या पतीसह धूळवड साजरी करताना दिसत आहे. पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पूजाच्या व सिद्धेशच्या नवऱ्याच्या चेहऱ्याला रंग लागलेले पाहायला मिळत आहेत. पूजाचा नवरा सिद्धेशनेही दोघांचे होळीचे काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यावर अनेकांनी त्यांना होळीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, लग्नानंतर पूजा आणि सिद्धेश हनिमूनसाठी विदेशात गेले होते. नवऱ्याबरोबर बीचवरची धम्माल पूजानं चाहत्यांबरोबर शेअर केली होती. तिच्या त्या फोटोला चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली होती. अशातच तिने तिच्या पहिल्या होळीनिमित्त शेअर केलेल्या खास फोटोलादेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी त्यांना होळी व धुळवडीच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.