Pooja Sawant First Makar Sankrant : मकर संक्रांत स्पेशल अनेक अभिनेत्री नटून थटून अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. अशातच मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंतचा मकर संक्रांत स्पेशल लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. पूजाची यंदा लग्नानंतरची ही पहिलीच मकर संक्रांत आहे. आणि ही संक्रांत तिने तिच्या पतीसह अगदी आनंदात थाटामाटात साजरी केली आहे. पूजाच्या या संक्रांत स्पेशल व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अभिनेत्रीने साजरी केलेल्या या संक्रांतीची झलक व्हिडीओद्वारे दाखवली आहे. पूजाने लग्नानंतरची पहिली मकर संक्रात ऑस्ट्रेलियात साजरी केली आहे. कारण सध्या पूजा भारतात नाही तर ऑस्ट्रेलियामध्ये आहे. त्यामुळे सिद्धेश व पूजा यांनी ऑस्ट्रेलियामध्ये हा सण साजरा केला आहे.
काही महिन्यांपूर्वीच पूजा सिद्धेश चव्हाणसह लग्नबंधनात अडकली. त्यांच्या लग्नाची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. पूजाचा नवरा हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियामध्ये स्थित आहे. त्यामुळे पूजा ऑस्ट्रेलियामध्ये येऊन जाऊन असते. आता पूजाचे आई-वडील आणि भाऊ-बहीणही लेकीच्या घरी ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. त्यामुळे पूजासाठी ही संक्रांत खूप खास आहे. यावेळी मात्र पूजाचे सासू-सासरे भारतात आहेत, त्यामुळे व्हिडीओ शेअर करत या खास दिवशी ती त्यांना मिस करत असल्याचं म्हटलं आहे.
आणखी वाचा – कपाळावर टिळा, बाप्पाचा गजर; सिद्धिविनायकाचे दर्शन घेताच हिना खान ट्रोल, नेटकरी म्हणाले, “मुस्लीम असून…”
पूजाने शेअर केलेल्या या व्हिडीओ अनेक कमेंट आल्या असून अनेकांनी त्यांचं भरभरुन कौतुक केलं आहे. पूजाने व्हिडीओ शेअर करताच या व्हिडीओखालील एका कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. पूजा व सिद्धेशच्या या व्हिडीओवर प्रिया चव्हाण म्हणजेच पूजाच्या सासूबाईंनी कमेंट केली आहे. यावेळी त्यांनी कमेंट करत असं म्हटलं आहे की, “‘मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा. पूजा व सिद्धू सुंदर दिसताय”. पूजाच्या सासूच्या या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
आणखी वाचा – “तिनेच दारुची सवय लावली”, प्रत्युषा बॅनर्जीच्या एक्स बॉयफ्रेंडचे काम्या पंजाबीवर धक्कादायक आरोप, काळं सत्य

व्हिडीओत पूजा सावंत व सिद्धेश चव्हाण दोघेही संक्रांतीनिमित्त पारंपरिक काळ्या रंगाच्या पोशाखात दिसत आहेत. पूजाने काळ्या रंगाची पैठणी नेसली आहे, तर सिद्धेशने काळ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. तसेच दोघांनीही हलव्याचे दागिने परिधान केले आहेत. दोघांचा हा संक्रांत स्पेशल लूक खूप चर्चेत आला आहे.