Hina Khan Troll : अभिनेत्री हिना खान तिसऱ्या स्टेजच्या स्तनाच्या कर्करोगाशी लढा देत आहे. पण या वेदनेतही ती हसताना दिसत आहे. बरेचदा ती अनेक कार्यक्रमांमध्ये स्पॉट होताना दिसते. त्यादरम्यान ती लोकांशी चांगला संवादही साधते. सोमवारी, १३ जानेवारी रोजी संध्याकाळी अभिनेत्रीने मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराला भेट दिली. पापाराझीने यावेळी अभिनेत्रीला मंदिराबाहेर स्पॉट केले. यादरम्यान चंकी पांडेही तेथे दिसला. ज्याला हिना भेटली आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. खरंतर हिना खान तिच्या आगामी वेब सीरिज ‘गृहलक्ष्मी’चे प्रमोशन करत आहे. यात तिच्याबरोबर चंकी पांडे, राहुल देव आणि दिव्येंदू भट्टाचार्य दिसणार आहेत.
हिना खानची गृहलक्ष्मी ही मालिका १६ जानेवारी रोजी OTT प्लॅटफॉर्म EPIC ON वर प्रवाहित होईल. यामध्ये अभिनेत्रीच्या पात्राचे नाव लक्ष्मी आहे तर चंकी पांजेने करीम काझीची भूमिका साकारली आहे. तर राहुल देव टोकस आणि दिव्येंदू विक्रम यांची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन रुमान किडवई यांनी केले आहे आणि अजयदीप सिंग व कौशिक यांच्यासह उमंग बीना सक्सेना यांनी ही कथा लिहिली आहे. आता प्रदर्शनापूर्वी ही स्टारकास्ट सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली आहे.
बाप्पाचे आशीर्वाद घेतल्यानंतर हिना खान मंदिराबाहेर दिसली. यावेळी ती निळ्या रंगाच्या पोशाखात दिसली. येथे, पॅप्ससाठी पोज देत असताना चाहत्यांनी तिला सेल्फीसाठी बोलावले आणि ती लगेच धावत गेली आणि चंकी पांडे हे दृश्य पाहतच राहिला. यादरम्यान अभिनेत्रीने ‘गणपती बाप्पा मोरया’ म्हणत लोकांची मने जिंकली. हिना खान आणि चंकी पांडे यांनी संभाषणानंतर एकमेकांना मिठी मारली. हा संपूर्ण क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. यावेळी दिव्येंदूही तिथे उभा होता.
आणखी वाचा – पारूच्या पाठीशी आदित्य खंबीरपणे उभा, अनुष्काबरोबर फोटोशूट करण्यासही नकार, मालिकेत रंजक वळण
हिनाच्या कपाळावर बाप्पाचे केशरी चंदनही लावले होते. सर्वांना भेटून ती तिथून निघून गेली. चाहत्यांनीही अभिनेत्रीचे खूप कौतुक केले आणि तो लवकर बरा होण्यासाठी प्रार्थना केली. तर काहींनी अभिनेत्रीवर टीका केली. हिना नुकतीच उमराह करुन आली होती आणि आता मंदिरात आल्याचे पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. एकाने लिहिले की, “हिना खान मुस्लिम असल्याने या गोष्टी करत आहे. देवाची तरी भीती बाळग”. तर एकाने लिहिले आहे, “बहिणी, एकच धर्म चांगला आहे”. आणखी एकाने लिहिले, ‘बहिणी, तुमचा धर्म नीट पाळा. आता तुझे काय होणार?”. तर एका नेटकऱ्याने, “बहिणी, मुस्लीम असून असं का करतेस?”.