‘आमचं ठरलं’ म्हणत अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रेमाची कबुली देत शाही विवाह सोहळा उरकला. अशातच प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचा फोटो शेअर करत साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या अभिनेत्रीच्या सौंदर्याचे लाखो चाहते दिवाने आहेत ती म्हणजे पूजा सावंत. पूजाने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच पूजाने तिच्या बॉयफ्रेंड बरोबरचा पाठमोरा फोटो शेअर करत रिंग फ्लॉन्ट करतानाचे काही फोटो शेअर केले होते. (Pooja Sawant Birthday)
पूजाने शेअर केलेल्या फोटोवरुन तिचा होणार नवरा कोण आहे याची बरीच चर्चा रंगली. मात्र नंतर अभिनेत्रीने स्वतःच तिच्या प्रेमाची कबुली देत तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो शेअर केला. पूजाच अरेंज मॅरेज असून तिचा होणारा नवरा सिद्धेश चव्हाण हा ऑस्ट्रेलियात राहतो. काही दिवसांपूर्वी सिद्धेशने पूजाला प्रपोज केला असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वर्षाअखेरीस पूजाने एक सुंदर व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये सिद्धेश तिला गुडघ्यावर बसून लग्नाची मागणी घालताना दिसला. सिद्धेशने गुडघ्यावर बसून पूजाला अंगठी घालत तिला प्रपोज केलं.
यानंतर आज पूजाच्या वाढदिवसाचे औचित्य साधत सिद्धेशने पूजाबरोबरचा एक खास फोटो शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोबरोबर त्याने, “आजच्या या खास दिवशी, आमचा बंध निर्माण केल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. आपल्या नात्यात तु नेहमीच ताकदीचा आधारस्तंभ आहेस. तुझा दिवस आणि येणारे वर्ष तुझ्या हसण्यासारखे सुंदर जावो. वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रेम” असं म्हणत त्याने होणाऱ्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.
याशिवाय पूजाचा वाढदिवस तिच्या मित्र मैत्रिणींनी व भावंडांनी धमाल मस्ती करत साजरा केला असल्याचंही पाहायला मिळत आहे. पूजाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. भूषण प्रधान, प्रार्थना बेहेरे व तिचा नवरा या व्हिडीओंमध्ये पूजाला केक भरवत शुभेच्छा देताना दिसत आहेत.