मराठी सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार विवाहबंधनात अडकत गेले. त्यांच्या विवाहसोहळ्याच्या अनेक फोटोंनी सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला पाहायला मिळाला. अशातच अभिनेत्री, गायिका स्वानंदी टिकेकर हिने गायक आशिष कुलकर्णीसह लग्नगाठ बांधली. २५ डिसेंबर २०२३ रोजी स्वानंदी-आशिष यांचा थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. स्वानंदी व आशिष यांच्या लग्नसोहळ्याचे अनेक फोटोस सोशल मीडियावर व्हायरल झाले. (Swanandi Tikekar Post)
स्वानंदी-आशिषच्या हळदी, मेहंदी व संगीत सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. दोघांनी आमचं ठरलं असं म्हणत त्यांच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावरुन दिली होती. तेव्हापासून सर्व चाहत्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या होत्या. त्यानंतर स्वानंदी व आशिष यांच्या शाही विवाहसोहळ्याने साऱ्या चाहत्यांना आनंद झाला. सिनेविश्वातील बऱ्याच कलाकारांनी स्वानंदी-आशिषच्या लग्नाचा उपस्थिती लावली होती.
लग्नानंतर ही जोडी संसारात रमलेली पाहायला मिळत आहे. आता ही जोडी लग्नानंतर फिरायला गेली असल्याचं समोर आलं आहे. स्वानंदी व आशिषने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन लग्नानंतर फिरायला गेला असल्याचे अनेक फोटो, व्हिडीओ पोस्ट केले आहेत. स्वानंदी व आशिष हिमाचल येथे फिरायला गेले आहेत. दोघांनी तेथील पर्वतरांगांमध्ये ट्रेक करतानाचे व्हिडीओदेखील शेअर केले होते. तेथील अनेक स्पॉट फ़िरतांचे अनेक व्हिडीओदेखील शेअर केले होते.
स्वानंदीने पोस्ट केलेल्या हिमाचल येथील पोस्टवर अनेकांनी कमेंट करत लाईक्सचा वर्षाव केला आहे. तर स्वानंदीच्या या पोस्टवर तिचे वडील उदय टिकेकर यांनी देखील हार्ट ईमोजी शेअर केली आहे.