‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेमधून अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली जोडी म्हणजे अक्षया देवधर. पाठकबाई म्हणून अक्षयाने महाराष्ट्रातील प्रत्येक चाहत्यांच्या मनात तिची वेगळी जागा निर्माण केली आहे. मालिकांनंतर नुकतंच अक्षयाने मराठी चित्रपटसृष्टीतदेखील पदार्पण केले आहे. नुकताच तिचा ‘पिल्लू बॅचलर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
अक्षया देवधर सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या काही अभिनेत्रींपैकी एक आहे. अक्षयाचा सोशल मीडियावरील चाहतावर्गदेखील मोठा आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. त्याचबरोबर ती तिचे अनेक अपडेट्सही चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच अभिनेत्री तिच्या काही मैत्रिणींसह ट्रीपला गेली आहे आणि याचे काही खास क्षण तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अक्षया देवधर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मैत्रिणींसह सिक्कीम या ठिकाणी ट्रीपसाठी गेली आहे आणि याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षयाने बर्फात आनंदाने एन्जॉय करत असतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोंमध्ये अक्षया बर्फात मनमुराद आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळत आहे.
अक्षया तिच्या मुक्ता लेले, मानसी कानेटकर व नीरजा देशमुख या मैत्रिणींसह सिक्कीम, गंगटोक इथे फिरायला गेली आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारेही या ट्रीपचे काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या या ट्रीपच्या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.