गेल्या अनेक दिवसांपासून आप पक्षाचे खासदार राघव चड्ढा आणि अभिनेत्री परिणिती यांच्या अफॅरची चर्चा सुरू होती . ते एकमेकांना डेट करत असल्याचे समोर आलं होतं. नुकताच पार पडलेल्या या दोघांच्या साखरपुड्याच्या पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.(Raghav Chadha viral video)
पहा व्हिडिओ मध्ये काय आहे (Raghav Chadha viral video)
परिणीती व राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यानंतर आता संसदेतील एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत संसदचे स्पीकर वैंकय्या नायडू राघव चड्ढा यांना “प्रेम एकदाच होतं ना? दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा होत नाही. फक्त पहिलं प्रेम खास असतं,” असं विचारतात.
वैंकय्या नायडू यांनी असं विचारताच संसदेत एकच हशा पिकल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यांच्या या प्रश्नानंतर राघव चड्ढा लाजल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्यावर राघव यांनी उत्तर दिलं की, ‘मी इतका अनुभवी नाही… परंतु खरंच चांगलं असतं सर…’ त्यावर नायडू लगेचच म्हणाले की, ‘पहिलं प्रेम नेहमीच खास असतं. ते प्रेम कायम राहिलं पाहिजे… आयुष्यभरासाठी…’ राज्यसभेतील या संवादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. (Raghav Chadha viral video)
हे देखील वाचा-अभिनेत्री प्राजक्ता माळीने सांगितले सोन्याच्या दागिन्यांचे महत्तव
असा पार पडला परिणिती आणि राघव यांचा साखरपूडा
राघव चड्ढा व परिणीती चोप्रा यांचा साखरपुडा १३मे रोजी नवी दिल्लीतील कपूरथला हाऊसमध्ये पार पडला. त्यावेळी दोघांच्या घरचे सदस्य आणि जवळचे मित्रमंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिणितीची बहिण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील उपस्थित होती. परिणितीनं तिच्या साखरपुड्याला मनिष मल्होत्रानं डिझाईन केलेला ड्रेस घातला होता.