मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कौतुकास्पद! पहिल्यांदाच कंटेन्ट क्रिएटर्सचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान, गायिका मैथिली ठाकुरचाही समावेश

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 8, 2024 | 3:08 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
National Creators Awards

Video : कौतुकास्पद! पहिल्यांदाच कंटेन्ट क्रिएटर्सचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सन्मान, गायिका मैथिली ठाकुरचाही समावेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी दिल्ली येथे ‘भारत मंडपम’मध्ये ‘नॅशनल क्रिएटर्स पुरस्कार’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये देशातील युवा व आंतरराष्ट्रीय कंटेन्ट क्रिएटर्सना वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रसिद्ध पॉडकास्टर रणवीर अल्लाहबादिया, जया किशोरी, गायिका मैथिली ठाकूर, ‘ट्रिगर्ड इंसान’ म्हणजे निश्चय मल्हान यांना गौरविण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये एकूण २३ क्रिएटर्सना पुरस्कार दिला आहे. भारतामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित केला गेला आहे. (National Creators Awards)

या आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी विजेत्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मैथिलीला गाणे गाण्याची विनंती केली. मोदी म्हणाले की, “आज मला तुम्ही काहीतरी ऐकवा. कारण लोकं माझं ऐकून थकले आहेत”. त्यानंतर मैथिलीने शिवरात्रीच्या निमित्ताने शिव भजन गायले. तिच्या गाण्यामुळे सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

आणखी वाचा – हार्दिक जोशीने कोल्हापूरमध्ये सुरु केला स्वतःचा व्यवसाय, मिसळचाही आनंद लुटता येणार, नेमकं कुठे सुरु केलं आहे हॉटेल?

#WATCH | Delhi: At the first-ever 'National Creators Award', PM Modi says "Today is International Women's Day, but for the first time I am seeing men present here are also clapping. I congratulate all the daughters who have been conferred with an award today. I am very proud of… pic.twitter.com/KAOVlic3Qq

— ANI (@ANI) March 8, 2024

तसेच ‘ट्रिगर्ड इंसान’ला अवॉर्ड देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काहीतरी असं सांगा ज्यामुळे ट्रिगर होईल”. निश्चयला गेमिंग क्षेत्रातील क्रिएटीव्हिटीसाठी गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्यानंतर निश्चय म्हणाला की, “ पीएम सर या पुरस्कारासाठी धन्यवाद . मी खूप अस्वस्थ आहे. मी काहीही विचार करुन आलो नव्हतो. मला माहीत नव्हतं की मला काही बोलावं लागेल. पण मी इथे येऊन बघितले की सर्वजण काही न काही बोलत आहेत तेव्हा मी फोनमध्ये काय बोलायचं ही बघू लागलो, विचार करू लागलो. पण समजत नाही आहे की नक्की काय बोलू. पण मी एक सांगेन की देशाने आता गेमिंग क्षेत्रालाही स्वीकारले आहे आणि मला या श्रेणीमध्ये पुरस्कार दिला त्यासाठी खूप धन्यवाद.

आणखी वाचा – आठ वर्षांचा संसार मोडला, दुसरं लग्नही केलं अन्…; सुप्रसिद्ध अभिनेता दुसऱ्या पत्नीपासूनही राहतो लांब, कामाच्याही शोधात, म्हणाला, “मुंबईमध्ये…”

याव्यतिरिक्त अजूनही काही क्रिएटर्सना गौरविण्यात आले. यामध्ये ग्रीन चॅम्पियन श्रेणीमध्ये पंखती पांडे, उत्तम कथाकार कार्तिका गोविंदासामी, टेक श्रेणीमध्ये गौरव चौधरी यांचाही सन्मान केला. ‘ट्रिगर्ड इंसान’ला ‘सेलिब्रिटी क्रिएटर ऑफ द इयर अवॉर्ड’दिला गेला. विजेत्यांचे पंतप्रधान मोदी यांनी खूप कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

Tags: content creatorsinternational content creatorpm narendra modisinger Maithili Thakur
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Amruta Khanvilkar shared special posts for Manjiri Oak Sonali Khare and Her Mother On the occasion of Women's Day

अमृता खानविलकरला 'या' तीन व्यक्तींशिवाय जमेना, आईही सतत असते पाठिशी, म्हणाली, "माझ्यासाठी संपूर्ण जग..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.