लहान पडद्यावरील ‘प्यार की ये एक कहानी’, ‘शक्ति-अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमधून अभिनेता विवियन डिसेना हा सर्वांसमोर आला. २०१३ मध्ये तो त्याची सह-अभिनेत्री वाहबीज दोराबजीबरोबर लग्न केले. पण काही कारणांमुळे २०२१ मध्ये दोघंही विभक्त झाले. त्यानंतर त्याने त्याची प्रेयसी नुरल एलिबरोबर दुसरे लग्न केले. दोघांना एक मुलगीही आहे. पण विवियन लग्नानंतरही पत्नी व मुलीपासून वेगळा राहत आहे. त्याबद्दल विवियनने खुलासा केला आहे. (actor vivian dsena wife)
विवियनने त्याची प्रेयसी नुरलबरोबर लग्नगाठ बांधली. ती मिस्रची राहणारी असून पेशाने पत्रकार आहे. पण विवियन आपल्या कुटुंबापासून लांब राहत आहे. कुटुंबापासून लांब असल्याचे कारण विचारले असता त्याने सांगितले की, “माझे कुटुंब बहरीनमध्ये राहते. मला मालिकाविश्वात काम करायचे असल्याने मी मुंबईमध्ये राहत आहे”. तसेच तो म्हणाला की, “मी टीव्ही किंवा ओटीटीमध्ये काम करण्यास उत्सुक आहे. मी काम शोधत आहे. मी परदेशात राहण्यासाठी अजून तितके पैसे कमावले नाहीत”.
विवियनची पत्नी नूरल व मुलगी लियान बहरीनमध्ये राहतात. तिच्या घरी सर्व वकील आहेत. पण तो म्हणाला की, “मुलीची व पत्नीची खूप आठवण येते. आम्ही एकमेकांना भेटत असतो. मी सध्या ओटीटी किंवा मालिकेवरील एखाद्या प्रोजेक्टच्या शोधात आहे”.
‘प्यार की ये एक कहानी’च्या मालिकेतून विवियानला प्रसिद्धी मिळाली. मालिकाविश्वाला एक हॅंडसम चेहरा मिळाला. तिथेच वाहबीजबरोबर त्याची मैत्री झाली आणि नंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण आपापसातील मतभेदांमुळे आठ वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला व वेगळे झाले.