Jui Gadkari Video : ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरु झाली तेव्हापासून अगदी टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. मालिकेच्या कथानकाबरोबरचा मालिकेमधील पात्रांनी ही मालिका एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. मालिकेतील अर्जुन-सायली या जोडीवरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. याशिवाय इतर पात्रही तितकीच चर्चेत असलेली पाहायला मिळतात या मालिकेमुळे घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुईने मालिकेत साकारलेल्या सायली या पात्रावरही प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. त्यांना जुईलीचे सायली हे पात्र विशेष आवडताना दिसतेय.
मराठी मालिकाविश्वाचा लाडका चेहरा व गुणी अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. अनेक मालिकांमध्ये काम करुन जुईने कलाविश्वात आणि प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमधून जुईला लोकप्रियता मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून झळकत असून तिने या मालिकेमध्ये सायलीची भूमिका साकारली आहे. जुई नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, चाहत्यांना सेटवरील आणि आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करते. आता देखील जुईने सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
जुईने सोशल मीडियावर आजवर शूटिंगच्या सेटवरील अनेक मजा-मस्तीचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. अशातच अभिनेत्रीने मोकळ्या वेळेत ती नेमकी काय करते याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जुईने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती लूडो गेम खेळताना दिसत आहे. लूडो गेम खेळताना चार किंवा दोन व्यक्तींची आवश्यकता असते. मात्र, जुई हा गेम स्वत:च एकटीने खेळत आहे.
आणखी वाचा – Video : ऐश्वर्या नारकर नक्की कसं आयुष्य जगतात?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण दिवसाचं शेड्युल
तिने एका टेबलवर लूडो गेम ठेवला आहे, त्यावर तिने ठिपक्यांचा ठोकळा फिरवला तेव्हा पहिल्याच फेरीत ठोकळा सहा ठिपक्यांचा पडला. त्यामुळे ती फार खूश झाली आणि नंतर स्वत: एकटीच निळ्या रंगाच्या सोंगट्यांसह लूडो गेम खेळू लागली. व्हिडीओ पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच…. डीओपींनी मला ऐ पोरी… अशी हाक मारली आणि ते नेहमी मला असेच म्हणतात आणि मी सध्या एकाच रंगातले लूडो खेळतेय”, असे कॅप्शन दिले आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनीदेखील यावर अनेक कमेंट केल्या आहेत.