Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : मराठी मालिकाविश्वात अभिनेता पियुष रानडेने त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. बऱ्याच मालिकांमध्ये त्याने साकारलेल्या भूमिका विशेष चर्चेत राहिल्या. अभिनयासह अभिनेत्याची लव्हलाईफही विशेष गाजली. पियुषचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं. लग्न व घटस्फोट यांमुळे अभिनेता नेहमीच चर्चेत राहिला. अशातच अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दोन लग्न मोडल्यानंतर अभिनेता त्याच्या तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे.
अभिनेत्री सुरुची अडारकर व अभिनेता पियुष रानडे यांच्या लग्नसोहळ्याचे फोटोस नुकतेच समोर आले आहेत. दोघांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोन्ही कलाकार मंडळींवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. सुरुची अडारकरचं हे पहिलं लग्न आहे. तर पियुष रानडे हा तिसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे.
पियुषची याआधी दोन लग्न असफल ठरली आहेत. २०१० साली पियुष अभिनेत्री शाल्मली टोळ्येसह लग्नबंधनात अडकला. शाल्मली ही अभिनेत्री असून ती एक स्टायलिस्टही आहे. शाल्मली व पियुषचा संसार दिर्घकाळ टिकला नाही. लग्नाला अवघे चार वर्ष होताच, म्हणजेच २०१४ साली त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर ‘अस्मिता’ ही मालिका करत असताना पियुषची ओळख मयुरी वाघसह झाली. मालिकेत एकत्र काम करता करता ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोन वर्ष मालिकेत एकत्र काम केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी २०१६ रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. मयुरीचं हे पहिलं लग्न होतं तर पियुषचं हे दुसरं लग्न होतं.
दोन्ही लग्नात पियुषला असफलता मिळाली. त्यानंतर आता पियुष तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे. पियुषच्या याआधीच्या दोन्ही लग्नाच्या घटस्फोटांची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत. अशातच अभिनेत्याने तिसरं लग्न उरकल्याने तो विशेष चर्चेत आला आहे.