रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘सातव्या मुलीची…’ मालिकेमध्ये येणार मोठा ट्विस्ट, सुप्रसिद्ध अभिनेत्याची होणार एन्ट्री, कथानकामध्ये पुढे काय घडणार?

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 6, 2023 | 4:49 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
marathi actor rajan tamhane entry in satvya mulichi satvci mulge serial

'सातव्या मुलीची…' मालिकेमध्ये येणार मोठा ट्विस्ट, सुप्रसिद्ध अभिनेत्याची होणार एन्ट्री, कथानकामध्ये पुढे काय घडणार?

झी मराठी वाहिनी वरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. अल्पावधीतच मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. मालिकेतील रहस्यमय कथानकामुळे ही मालिका दिवसेंदिवस रोमांचक व रहस्यमय होत आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. अशातच या मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट येणार आहे. मालिकेत एका नवीन पात्राची एण्ट्री होणार असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेते राजन ताम्हाने यांची या मालिकेत एण्ट्री होणार आहे. (

‘मराठी टेलिबझ’ या इन्स्टाग्राम पेजने याविषयीची एक पोस्ट शेअर केली असून मालिकेतील त्यांच्या एण्ट्रीविषयी सांगितले आहे. झी मराठी वाहिनीने अद्याप याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण त्यांच्या एण्ट्रीबाबतच्या अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत. या मालिकेतील त्यांची भूमिका किंवा पात्र याविषयी अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. दरम्यान राजन यांनी याआधी ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत अप्पूच्या वाडीलयांकि भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेला चाहत्यांनी लोकप्रियता मिळाली होती. त्याचबरोबर मालिकेत ही नवीन एण्ट्री कधी होणार? याविषयीही अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. परंतू काही ‘मराठी टेलिबझ’ने पोस्ट शेअर करत राजन ताम्हाने यांच्या मालिकेतील एण्ट्रीबाबत खुलासा केला आहे.

आणखी वाचा – Video : दारुच्या नशेमध्ये रस्त्यावर फिरत होता सनी देओल, रिक्षा चालवणाऱ्यालाही अडवलं अन्…; व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्याचा मोठा खुलासा

मालिकेत आतापर्यंत दोन पेट्यांचा उलगडा झाल्यानंतर आता तिसरी पेटीचाही उलगडा झाला आहे. गेल्या काही भागांत अद्वैतला सर्पदंश झाल्याचे प्रेक्षकांनी पाहिले. मात्र नेत्राने त्या सापाला भिरकावत अद्वैतचा जीव वाचवला. पण त्यानंतर पुन्हा अद्वैतने नेत्रावर हल्ला केला होता. या पेटीतून उलगडणाऱ्या रहस्यामुळे नेत्रा व अद्वैतच्या नात्यामध्ये बदल होणार का?, तसेच पेटीमधल्या मजकुरावर लिहिलेली सर्पलिपी वाचायला त्यांची मदत कोण करणार? या प्रश्नांचीही उत्तरं प्रेक्षकांना मिळणार आहेत.

आणखी वाचा – Bigg BOSS 17 : ‘बिग बॉस’मुळे अंकिता लोखंडे व विकी जैनमधील वाद पेटणार, नवरा-बायकोचं भांडण पाहून प्रेक्षकही भडकले, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, मालिकेत राजन ताम्हाने यांच्या नवीन एण्ट्रीविषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच या पोस्टखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत राजन यांच्या एण्ट्रीविषयी आनंद व्यक्त केला आहे. या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत त्यांच्या भूमिकेविषयी तर्क वितर्क लावले आहेत. त्यामुळे मालिकेत या एण्ट्रीमुळे आता काही नवीन वळण येणार का? या नवीन एण्ट्रीचा अद्वैत-नेत्राच्या नात्यावर काही परिणाम होणार का? हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Tags: entertainmententertainment newsmarathi entertainmentMarathi newsmarathi serialsatvya mulichi saatvi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding

Suruchi Adarkar Piyush Ranade Wedding : दोन लग्न, घटस्फोट अन्…; पियुष रानडेच्या पूर्वाश्रमीच्या दोन्ही पत्नी होत्या मराठी अभिनेत्री, तिसऱ्या लग्नामुळे चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.